अन..आकाशातून पडला होता मृतदेहांचा पाऊस … ! काही वेळातच शेताचे झाले स्मशान 

वृत्तसंस्था : काही दिवसांपूर्वी आकाशातून माशांचा पाऊस पडल्याच्या बातम्यांमुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल माडीयावर व्हायरल झाला होता. पण जर आकाशातून मृतदेहांचा पाऊस पडला होता असे म्हंटले तर तुमच्या भुवया नक्कीच उंचावतील. हो … ! हे खरंय ३० वर्षांपूर्वी स्कॉटलंडमध्ये अशी  धक्कादायक घटना घडली होती. स्कॉटलंडमधील लॉकरबी गावातील शेतकऱ्यांनी हा भयानक अनुभव घेतला होता. त्यावेळी आकाशातुन एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ९८ मृतदेह पडले होते.
नक्की काय घडले होते ?  
लॉकरबी गावातील परिसरात एक मोठा स्फोटाचा आवाज झाला आणि एका पाठोपाठ एक मृतदेह आकाशातून खाली पडायला सुरुवात झाली. अनेक किलोमीटर लांबवरून स्फोटाचा आवाजही आला. हा मृतदेहाचा पाऊस एका विमान अपघातामुळे पडला होता.  त्याठिकाणी पॅन एमचे फ्लाइट १०३ क्रॅश झाले होते. ही फ्लाइट जर्मनीच्या फ्रँकफर्टहून लंडनला जात होती पण तेव्हाच त्यात ब्लास्ट झाला. बॉम्ब स्फोटामुळे अनेक मृतदेह जमिनीवर पडू लागली. अनेक लोक तर जीवंतच जमिनीवर पडू लागले. नंतर त्यांचा मृत्यूही झाला. संपूर्ण परिसर स्माशानभूमी बनले होते.

या विमान दुर्घटनेत एकूण २४३ प्रवासी होते. त्यातील ११ जण रहिवासी भागात ठार झाले होते. या विमानात झालेल्या स्फोटानंतर या विमानाचा काही भाग शहरी भागात तर काही भाग हा ग्रामीण भागात पडला होता. ज्या राहिवासी भागात विमानाचा काही भाग पडला होता त्यात ११ जण ठार झाले होते.
या दुराघटनेनंतर लागेचच पोलिसांनी  तपास सुरु केला. प्रत्येक मृतदेहाची तपासणी केली जात होती. तपासाअंती पोलिसांना समजले की या विमानात दहशतवादी हल्ला झाला होता.एका छोट्या बॉम्ब स्फोटामुळे विमानात २० इंचाचा खड्डा तयार झाला होता. जेव्हा स्फोट झाला तेव्हा विमान ३१ हजार फुटावर होते. पण हवेच्या दाबामुळे ते १९ हजार फुटावर आले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या विमानातील प्रवाशांच्या मृतदेहांचा पाऊस पडायला सुरुवात झाली. बघता बघता शेताला स्मशानाचे रूप आले  होते.