पुरूष त्यांच्या त्वचेची ‘देखभाल’ करताना करतात ‘या’ 5 चूका, होऊ शकतो ‘पश्चाताप’, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महिला त्यांच्या त्वचेची आणि सौंदर्याची खूप काळजी घेतात. यासाठी त्या खूप प्रयत्न देखील करत असतात. परंतु जर याबाबतीत पुरुषांबद्दल बोलायचे म्हणले तर ते आपल्या शरीराच्या सौंदर्याकडे खूप दुर्लक्ष करत असतात. असे बरेच पुरुष आहेत जे त्वचेची काळजी घेतात. मात्र त्वचेची काळजी घेत असताना पुरुष अनेकदा काही चुका करतात. चला तर मग जाणून घेऊया अशा पाच चुका ज्या पुरुष वारंवार करत असतात.

1. मॉइश्चराइजर न लावणे
त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा टोनिंग व क्लींजिंग वापरणे केवळ स्त्रियांसाठीच आवश्यक नाही तर पुरुषांनी त्वचेची काळजी घेण्यासाठी मॉइश्चरायझर देखील लावणे गरजेचे आहे. असे केल्याने केवळ त्वचा मऊच राहत नाही तर हायड्रेटेड देखील होते.

2. पायांवर दुर्लक्ष करणे
पुरुष सर्वात जास्त पायांकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही नेहमी पायाची बोटे स्वच्छ करणे आणि काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कारण पुरुषांना दिवसभर मोजे घालावे लागतात, ज्यामुळे बोटांमध्ये बुरशी व वास यासह संसर्ग होण्याचा धोका असतो. आपल्या पायांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

3. चेहऱ्यासाठी साबणाचा वापर करणे
ज्याप्रमाणे महिला चेहऱ्यासाठी साबणाचा वापर करत नाहीत, त्याचप्रमाणे पुरुषांनीही चेहऱ्यावर साबण वापरू नये. चेहरा धुण्यासाठी फेस वॉश किंवा शॉवर जेल वापरणे चांगले आहे.

4. जास्त प्रमाणात डिओचा वापर
प्रत्येक गोष्टीला मर्यादा असते. जर तुम्ही जास्त डीओचा वापर करत असाल तर ते योग्य नाही. तुम्ही डिओचा वापर करा पण तो मर्यादित.

5. बाहेर पडताना रुमालचा वापर न करणे
मुली नेहमी बाहेर पडताना आपला चेहरा कव्हर करण्यासाठी स्कार्प बांधतात त्यामुळे चेहऱ्यावर धुळ बसत नाही. तसे पुरुष करत नाही. पुरुषांनीही आपला चेहरा कव्हर करण्यासाठी रुमालचा वापर केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर धुळ बसणार नाही. चेहऱ्यावर धुळ बसल्याने चेहरा लगेच खराब होतो. त्यामुळे या गोष्टी लक्षात राहणे गरजेचे आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/