शारीरिक संबंधाबाबत पुरुषांच्या मनात असते ‘ही’ भीती, ‘अशी’ करा मात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुरुषांमध्ये सेक्सबाबत महिलांपेक्षा जास्त सक्रियता असते असे म्हटले जाते. परंतु अनेकदा असे होते की, पुरुष याबाबत विचार करतात आणि अनेक शंका मनात निर्माण करून घेतात. याच शंका भीतीमध्ये बदलतात. यामुळे त्याचा सेक्सवरही परिणाम होतो. या मुळे त्यांना अनेक समस्या उद्भवतात. ते काय उपाय करू शकतात याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

पुरुष तेव्हाच चांगलं परफॉर्म करतात. जेव्हा त्यांच्या आतून आवाज येईल आणि ते तणावमुक्त असतील. त्यामुळे जास्त विचार करण्यापेक्षा तुम्ही केवळ या क्षणाचा आनंद घ्या.

जर तुम्हाला वाटत असेल की, पार्टनरला संतुष्ट करण्यासाठी पेनिसची साईज मोठी असावी तर हा विचार आपल्या मनातून काढून टाका. यामुळे नकारात्मक प्रभाव पडतो. फक्त पार्टनरसोबत कनेक्शन बनवा. अनेकदा पुरुष माहिती मिळवण्यासाठी पॉर्न पाहतात आणि त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. यात अयशस्वी झाल्यानंतर पुरुषांना वाटतं की, आपल्यात काहीतरी कमी आहे. पुरुषांना या सगळ्यावर मात करण्यासाठी हे समजायला हवं की, पार्टनरला प्रेम देण्यासाठी त्यांना कोणत्याही सहाऱ्याची गरज नाही.

हे गरजेचं नाही की, जितक्या वेळा तुम्ही सेक्स करता तितक्या वेळा तुमची पार्टनर प्रेग्नंट व्हावी. त्यामुळे पार्टनरच्या प्रेग्नंट न होण्यामुळे स्वत:ला कमी समजू नका. जर काही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टरांशी वेळेत संपर्क करा. कोणत्याही प्रकारचा तणाव तुमच्यासाठी काळजीच कारणं ठरू शकतं.

आरोग्यविषयक वृत्त