Men Health Tips | पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट कमी करतात ‘या’ 4 चुकीच्या सवयी, होऊ शकतो पश्चाताप

0
1321
Men Health Tips | men health tips reasons for low sperm count in men
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Men Health Tips | तुमच्या काही वाईट सवयी तुम्हाला महागात पडू शकतात. होय, काही वाईट सवयींचा तुमच्या स्पर्म काऊंट म्हणजे शुक्राणूंच्या संख्येवर वाईट परिणाम होऊ शकतो. जास्त ताण, चुकीचे खाणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे प्रजनन क्षमता प्रभावित होऊ शकते. अशावेळी जर तुमच्या सेक्स ड्राईव्हमध्ये काही समस्या असेल तर त्यामागे काही सवयी असू शकतात. यासाठी कोणत्या सवयी सोडल्या पाहिजेत? ते जाणून घेऊया.. (Men Health Tips)

 

या वाईट सवयींमुळे पुरुषांचा स्पर्म काऊंट होतो कमी –

1. तणावात राहणे –
वारंवार तणाव येत असेल तर सावध राहा कारण पुरुषांमध्ये तणावामुळे स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो. पुरुषांमध्ये, चिंता आणि तणावामुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे आजपासूनच आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि तणावापासून दूर राहा. (Men Health Tips)

 

2. व्यायाम न करणे –
व्यायाम न केल्यामुळे लठ्ठपणाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. त्याच वेळी, लठ्ठपणामुळे, आपल्या शुक्राणूंची गतिशीलता मंदावते. ज्याचा लैंगिक जीवनावर परिणाम होतो. म्हणूनच एका जागी बसण्याची सवय आजपासूनच सोडली पाहिजे. तसेच पुरुषांनी रोज व्यायाम केलाच पाहिजे.

3. रात्री उशिरा झोपण्याची सवय
रात्री उशिरा झोपल्यामुळे तणाव आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. तसेच रात्रीच्या वेळी जागरण केल्यामुळे मानसिक त्रास होतो आणि प्रतिकारशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे रात्री उशिरा झोपण्याची सवय आजच सोडा.

 

4. मद्यपानाची सवय –
दारू, तंबाखूचे सेवन पुरुषांसाठी घातक ठरू शकते. कारण अल्कोहोलच्या अतिसेवनाने टेस्टोस्टेरॉनवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या स्पर्म काउंट वर त्याचा परिणाम होतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Men Health Tips | men health tips reasons for low sperm count in men

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tiger Shroff | अ‍ॅक्शन सीन शूट करताना टायगर श्रॉफच्या पायाला दुखापत (VIDEO)

T20 World Cup 2022 | टीम इंडियाला मोठा झटका! ‘हा’ प्रमुख खेळाडू बांग्लादेश विरुद्ध नाही खेळणार

Devendra Fadnavis | शिंदे गटातील आमदार आणि खासदारांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा, – गृहमंत्र्यांनी दिले आदेश