म्हणून ३५ वयानंतर पुरुषांनी कराव्यात ‘या’ तपासण्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य आहे. कारण आरोग्य तर चांगले असेल तर कोणतेही मोठ्यातील मोठे काम आपण करू शकतो. त्यामुळे कोणतेही काम करण्यासाठी आपल्याला आरोग्य जपण खूप महत्वाचं आहे. वयाच्या २५-३० पर्यंत आपण सुदृढ असतो. पण वय ३० च्या पुढे गेलं कि अनेक आजार सुरु होतात. पण स्रियांपेक्षा पुरुषांची धावपळ जास्त असते. त्यामुळे त्यांचं त्यांच्या आरोग्याकडे अजिबात लक्ष नसत. पण वयाच्या ३५ वर्षांनंतर त्यांनी आपल्या शरीराच्या काही तपासण्या पूर्ण करायलाच हव्यात.

१) पुरुषांनी ६ महिन्यातून एकदा आपल्या दाताचे चेकअप करून घ्या. आता पुरुष म्हणतील दाताचे काय चेकअप करायचे. पण दातांच्या रोगामुळे हृदय विकाराचा धोका खूप मोठा असतो. त्यामुळे ६ महिन्यातून एकदा तरी दातांचे चेकअप करून घ्या.

२) पुरुषांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉलचे चेकअप करणे गरजेचे आहे. कारण आता तरुणांमध्ये सुद्धा हृदयविकाराचे प्रमाण वाढले आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्याने धमन्यांमध्ये प्लाक जमा होते. त्यामुळे ब्लड सर्कुलेशन प्रभावित होत.

३) पुरुषांनी वयाच्या ३५ वर्षांनंतर ब्लड आणि शुगरची तपासणी वर्षातून कमीतकमी दोन वेळा करणे गरजेचे आहे. कारण ब्लड मधील शुगर वाढली तर मधुमेह
होण्याची दाट शक्यता असते.

४) वयाच्या ३५ वर्षांनंतर पुरुषांनी कमरेची तपासणी करणे आवश्यक असते. कारण वयाच्या ३५ वर्षांनंतर पुरुषातील लठ्ठपणाचं प्रमाण वाढायला लागत. पुरुषांचा कमरेचा घेर जर मोठा झाला असेल तर नक्की तपासणी करा. कारण यामुळे हृदययाचे विविध रोग होण्याचा धोका असतो.

५) ३५ वर्ष वयानंतर पुरुषांनी एसटीडी टेस्ट करून घ्या. कारण ३५ वर्ष पुरुषांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय लैंगिक संबंध ठेवणे धोक्याचे असते. तसे केल्यास पुरुषांना एसटीडी होण्याचा धोका असतो.

फेसबुक पेज लाईक करा –