स्टडी : कोरोना संक्रमित पुरुषांमध्ये नपुंसकत्वचा धोका 3 पटीने अधिक !

पोलिसनामा ऑनलाईन – जर एखाद्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल तर, इरेक्टाइल डिसफंक्शन अर्थात नपुंसकत्व होण्याचा धोका तीन पटीने वाढत असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. रोम विद्यापीठातील डॉक्टरांनी 100 पुरुषांच्या प्रजनन क्षमतेची तपासणी केली आहे. यात त्यांना असं आढळलं की, या पैकी 28 टक्के पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन अर्थात नपुंसकत्व असल्याचे आढळले आहे. सामान्य स्तरावर 9 टक्के लोकांना ही समस्या उद्भवली आहे. अर्थात त्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला नाही.

तसेच रोम विद्यापीठाच्या डॉक्टरांनी 100 लोकांशी संवाद साधला आहे. त्यांचे सरासरी वय 33 वर्षे इतके होते. यापैकी 28 जणांना इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुंसकत्व असल्याचे आढळले होते. ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही यातील केवळ 9 टक्के लोकांना ही समस्या होती. याचा अर्थ असा आहे की, कोरोना संक्रमित पुरुषांत सामान्य पुरुषांपेक्षा तीन पटीने इरेक्टाइल डिसफंक्शन अर्थात नपुंसकत्व आढळून आले आहे. हा अभ्यास तसेच संशोधन अँड्रॉलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

याबाबत संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोना व्हायरसमुळे एंडोथेलियममध्ये जळजळ होत असते. मनुष्याच्या रक्तवाहिन्यांमधील ही एक थर असून हे संपूर्ण शरीरात असते. तसेच पुरुषांच्या गुप्तांगात रक्तपुरवठा करणारी नसा खूपच लहान आणि पातळ असतात. अशा परिस्थितीत, कोणत्याही प्रकारे जळजळ झाल्यास, रक्तपुरवठा खंडित होतो. याचा परिणाम त्यांच्या लैंगिक वर्तनावर झाल्याचाही दिसून येतो.

पुरुषांवर कोरोना संसर्गाच्या परिणामावर हे नवीन संशोधन आहे. यातून हे सिद्ध झाले आहे की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा स्त्रियांपेक्षा पुरुषांवर सर्वात वाईट परिणाम होतो. महिलांपेक्षा कोरोना विषाणूमुळे 1.7 पट अधिक पुरुषांचा मृत्यू होत असल्याचे आढळले आहे. याशिवाय लोक बर्‍याच गंभीर आजारांनी त्रस्त झालेले आहेत.

तथापि, काही तज्ञ म्हणतात की, इरेक्टाइल डिसफंक्शन अर्थात नपुंसकत्व आणि कोरोना विषाणूचे संबंध लैंगिक इच्छेला जागृत करणार्‍या इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या पातळीवर देखील अवलंबून असतो. युनायटेड किंगडममधील कोरोना साथीच्या विपरीत, स्त्रिया सामान्यत: पुरुषांपेक्षा 7.7 वर्षे अधिक जगतात. यामागील कारण म्हणजे इस्ट्रोजेन हार्मोन हे आहे, ज्यामुळे त्यांची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहते. त्यांना हृदयाशी संबंधित आजारांपासून वाचवत असते.

जरी टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सचे प्रमाण वाढले तरी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीत बर्‍याच रोगांचे प्रमाण वाढते. कोरोना व्हायरसच्या संसर्गानंतर या गोष्टीचा धोका अधिक प्रमाणात वाढतो. अलीकडेच, एक अभ्यास आला आहे ज्यात न्यूयॉर्कस्थित आयकॉन स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रोफेसर शन्ना स्वान यांनी सांगितले की, पुरुष विशिष्ट रसायनांमुळे वडील होण्याची क्षमता गमावत आहेत. त्यामुळे पुरूषांवर कोरोना विषाणूचा अधिक परिणाम होत असल्याचे संशोधनातून आढळून आले आहे.