पुरुषांनो, ‘या’ 6 आजारांच्या लक्षणांवर ठेवा लक्ष, आहे जास्त धोका !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – महिलांच्या तुलनेत पुरूष आरोग्य आणि फिटनेसकडे खुप जास्त दुर्लक्ष करतात. खुप बिझी आहे, हे कारण यासाठी सांगितले जाते. परंतु, जर तुमचे आरोग्य बिघडले तर तुम्ही बिझी राहू शकत नाही आणि चालणे, फिरणेदेखील अवघड होऊ शकते. वाढता ताण, जंकफूड आणि व्यायामाचा अभाव आदीमुळे पुरूष आजारांमुळे अधिक पीडित असतात. हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुसे व इतर आजार पुरूषांना जास्त प्रमाणात होतात. या आजारांची लक्षणे ओळखता येणे खुप गरजेचे आहे.

हे आहेत ते आजार

1) निद्रानाश
पुरूषांमध्ये निद्रानाशाचे प्रमाण खुप आहे. घोरणे, धापा टाकत उठणे, थकवा व डोकेदुखी ही याची लक्षणे आहेत. यासाठी अतिरिक्त चरबी व वजन कमी करा. योग्य आहार घ्या.

2) टेस्टिक्युलर व कॅन्सर
ओटीपोट किंवा मांडीच्या सांध्याखाली हळुवार वेदना होणे, पाठीच्या खालील बाजूस होणारी पाठदुखी, धाप लागणे, छातीत दुखणे, पायांना सूज येणे ही टेस्टिक्युलर व कॅन्सरसाठी असामान्य लक्षणे आहेत. अंडकोषाच्या दोन्ही बाजूस वेदनारहित गाठ येणे व सूज येणे ही लक्षणे आहेत. यासाठी नियमित कालांतराने अंडकोषांची तपासणी करा, ज्यामुळे असामान्य अशी बाब निदर्शनास येऊ शकते, जसे आकार, वजन किंवा घडणीमध्ये बदल.

3) कोलोरेक्टल व कॅन्सर
कोलोरेक्टल व कॅन्सर हा सर्वाधिक पुरूषांमध्ये दिसून येतो. ओटीपोटीत सतत वेदना होणे, थकवा, विष्ठेमध्ये रक्त, आंत्र सवयींमध्ये बदल, अतिसाद व अनपेक्षितपणे वजन कमी होणे ही लक्षणे आहेत. यासाठी उच्च मेदयुक्त आहाराचे सेवन व धूम्रपान कमी करा. डॉक्टरांना भेटून तपासणी करा.

4) हृदयघात
छाती भरल्यासारखे वाटणे, हृदयाच्या डाव्या बाजूस काही मिनिटांहून अधिक काळ छातीत दुखणे, धाप लागणे व घाम सुटणे ही हृदयाघाताची लक्षणे आहेत. यासाठी योग्य रक्तदाब पातळी राखण्याचा प्रयत्न करा. ताण व्यवस्थापन, आरोग्यदायी आहार व नियमितपणे व्यायाम यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.

5) पिसोनियस सायनस
हा लहानसा गळू आहे, जो नितंबाच्या वरील बाजूस असलेल्या फटीमध्ये होतो. बसताना किंवा उभे राहताना वेदना होणे. फटीमध्ये सूज येणे, त्वचा लालसर होणे, भागाभोवती त्वचेवर व्रण येणे, गवूमधून पू किंवा रक्त बाहेर पडणे, जखमेमधून केस बाहेर पडणे ही याची लक्षणे आहेत. यासाठी स्वच्छता राखण्याकरिता भाग कोरडा व स्वच्छ ठेवा, तसेच दीर्घकाळापर्यंत बसणेसुद्धा टाळा.

6) थायरॉईड
स्नायूवेदना, एकाग्रतेमध्ये समस्या आणि थकवा अशी लक्षणे आहेत. काही पुरूषांना इरेक्शन्स असण्यामध्येसुद्धा समस्या जाणवते. यावर उपाय म्हणून आनंदी व फिट राहा. सुलभ कामाचा अवलंब करा, सुट्टीवर जा, चिंतन करा किंवा गाणे ऐकणे वा नृत्य असे छंद जोपासा.