‘ही’ एक गोष्टही करू शकते तुमचं ‘लैंगिक’ जीवन ‘उध्वस्त’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या दैनंदिन जीवनातील अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा आपल्या लैगिक जीवनावर म्हणजेच सेक्सवर परिणाम होत असतो. परंतु एकच गोष्ट अशी आहे ज्याच्यामुळे तुमचं लैंगिक जीवन उध्वस्त होऊ शकतं. याच गोष्टीबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. वेळीच या गोष्टीबाबत पुरुषांनी माहीत करून घ्यायला हवे. जेणेकरून तुम्ही तुमच्या लैंगिक जीवनाला वेळीच वाचवू शकता.

डिप्रेशनमुळे सेक्स लाईफ धोक्यात
जी एक गोष्ट तुमचं सेक्स लाईफ संपवू शकते ती आहे डिप्रेशन. डिप्रेशनचे काय परिणाम होतात हे आपण जाणतोच. आजकालची कॉमन समस्या म्हणजे डिप्रेशन आहे. परंतु याचा तुमच्या शरीराच्या गुणवत्तेवर प्रभाव पडतो. त्यामुळे डिप्रेशनला तुम्ही हलक्यात घेता कामा नये. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अनेक अडचणींमुळे या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येते. रिसर्चमधून ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, डिप्रेशनचा तुमच्या सेक्स लाईफवर वाईट परिणाम होतो.

रिसर्च नेमकं सांगतो तरी काय ?
तुम्हाला सांगू इच्छितो की, दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जर एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये असेल तर त्याच्या स्पर्मच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कोणत्याही महिलेचं किंवा पुरुषाचं जीवन हे स्पर्मवर अवलंबून असतं. तुमचे स्पर्म कमजोर होणं म्हणजे तुमच्या सेक्स लाईफवर परिणाम होणं आहे. असं रिसर्च सागंतो. त्यामुळे डिप्रेशनच्या समस्येला जर तुम्ही सामोरे जात असाल तर वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.

रिसर्चमध्ये ११०० लोकांचा समावेश
या रिसर्चमध्ये तब्बल ११०० पुरुषांच्या स्पर्मचं परिक्षण करण्यात आलं. यातही डिप्रेशनने ग्रस्त आणि डिप्रेशन नसलेले पुरुष अशा दोन प्रकारच्या लोकांचा समावेश करण्यात आला होता.

निष्कर्ष
अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांचा अभ्यास केला. डिप्रेशन किती काळ असल्यास त्याचा स्पर्मवर काय परिणाम होतो याचेही त्यांनी बारीक निरीक्षण केले. या रिसर्चमधून असं समोर आलं की, डिप्रेशनचा वाईट प्रभाव स्पर्मवर म्हणजेच सेक्सवर होतो. स्पर्मची गुणवत्ता खालावल्याने सेक्स लाईफ विस्कळीत होते. त्यामुळे बाळाला जन्म देण्यावरही याचा गंभीर परिणाम होतो. तुम्हाला सांगू इच्छितो की, हेल्थ जर्नल मेडिसिन नेटवर्कमध्ये या रिसर्चचे प्रकाशन करण्यात आले आहे.

You might also like