अजबच आहे ! ‘या’ गावात पुरुषांना आहे ‘नो एन्ट्री’

नैरोबी : वृत्तसंस्था – अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रथा आहेत. आतापर्यंत अनेक विचित्र प्रथांबद्दल तुम्ही ऐकले किंवा वाचले असेलच. आजही आपण अशाच एका विचित्र प्रथेबाबत माहिती घेणार आहोत. अनेक ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृती आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु असे एक अजब गजब गाव आहे जे याला अपवाद ठरल्याचे दिसत आहे. या गावात पुरुषांना अजिबात प्रवेश नाही.

केनियाची राजधानी असलेल्या नैरोबी शहराजवळ हे गाव आहे. विशेष म्हणजे  या गावात फक्त महिलाच राहतात. ‘उमोजा’ असं  महिलाराज असलेल्या या गावाचं नाव आहे. केनियाची राजधानी असलेल्या नैरोबी शहराजवळ हे गाव आहे. मुख्य म्हणजे या गावात कोणतीही महिला जाऊ शकते, राहूही शकते. मात्र, पुरुषांना येथे ‘नो एन्ट्री’ आहे.

असे उदयास आले ‘उमोजा’ गाव

रेबेका लोलोसोली नावाच्या एका महिलेने 15 महिलांना सोबत घेऊन उमोजा गावाची स्थापना केली. 1990 साली या गावची स्थापना झाली आहे. या गावात फक्त कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिला तसेच बलात्कार पीडित महिलांना राहण्यास परवानगी आहे. या गावात विशेषकरून ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केलेल्या महिलांचा जास्त समावेश आहे. 16 वर्षांच्या तरुणींपासून ते 80 वर्षांच्या आजीबाईंचे या गावात वास्तव्य आहे.

या गावातील महिलांचा मुख्य व्यवसाय

दागिने बनवणे हा या गावातील महिलांचा मुख्य व्यवसाय आहे. उमोजा गावावर पुरुषांनी अनेकवेळा हल्ला करून गावात घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र महिलांनी त्यांना वेळोवेळी हुसकावून लावले आहे. काहीवेळा तर घरातल्या बायका पळून उमोजा गावात राहायला आल्यामुळे देखील वाद झाले आहेत. येथील महिला डेटवर जाऊ शकतात, पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेऊ शकतात आणि लग्न करू शकतात. मात्र, हे सर्व गावाच्या वेशीबाहेरच त्यांना करावे लागते. गावच्या वेशीच्या आत असं कोणतंही कृत्य ते करू शकत नाहीत.

You might also like