धक्कादायक ! २ वृद्धांनी केला वृद्धेचा विनयभंग

पिंपरी (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन – सांगवी येथील पीडब्ल्यूडी ग्राउंडवर एका ५९ वर्षीय वृद्धेचा ५५ वर्षीय दोन वृद्धांनी विनयभंग करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर आरोपी हे पीडित महिलेच्या ओळखीचे आहेत. बुधवारी (१५ मे) सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली असून पोलिसांनी रॉबीन अशोककुमार जैन (५५, रा. पौड) व राजेश शर्मा (५५, रा. खडकीबाजार) या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित महिला तिच्या मानलेल्या भावाला भेटण्यासाठी सांगवी येथे आली होती. तेव्हा आरोपींनी महिलेशी गैरवर्तन केले. त्यातील एकजण महिलेशी अश्लील बोलला. तर दुसऱ्याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. याला विरोध करत महिलेने त्यातील एकाला ढकलले असता, त्याने तिच्या कानाखाली मारली. याविषयी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास फौजदार व्ही. व्ही. कुमटकर तपास करीत आहेत.

Loading...
You might also like