‘या’ अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करणारी महिला अटकेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेता करण ओबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या ज्योतिषी महिलेला ओशीवरा पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:वर हल्ला झाल्याचा बनाव या महिलेने केला होता. त्यानंतर याची खोटी तक्रार पोलिसांत दिली होती. पुरावे समोर आल्यानंतर तिच्या या कृत्याचा पर्दाफाश पोलिसांनी केला.

असा घडला होता प्रकार
तक्रारदार महिला मॉर्निंग वॉकला जात असताना काही अनोळखी आरोपींनी करणविरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घेतला नाही तर अंगावर असिड फेकण्याची धमकी दिली होती. अशी तक्रार महिलेने पोलिसांत दिली होती.

महिलेवर हल्ल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तपास करून सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींना अटक केली. त्यात महिलेचे वकिल अली काशीफ खान यांनीच हा कट रचला. असे त्यांनी चौकशीत सांगितले. यातील चौघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. त्यातील त्यात वकिलाच्या एका नातेवाईक आहे. वकिलाने यासाठी पैसे दिल्याचेही समोर आले आहे.

आरोग्य विषयक वृत्त-
बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’, ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’साठी देखील फायदाच
#YogaDay2019 : नियमित योगा करा…आणि स्मरणशक्ती वाढवा
#YogaDay2019 : मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदान आहे ‘मुद्रासन’

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like