काय असते Menorrhagia ? जाणून घ्या महिलांना कधी होतो हा त्रास आणि काय आहेत याचे उपचार

पोलिसनामा ऑनलाईन – बर्‍याच महिला पिरियड्समध्ये पोटात तीव्र वेदना आणि अधिक रक्तस्त्राव झाल्याची तक्रार करतात. या असामान्य स्थितीस मेनोरेजिया म्हणतात. मेनोरेजियामध्ये रक्तस्त्राव इतका होतो की, दर तासाला पॅड बदलण्याची गरज भासते. याशिवाय मेनोरेजियामध्ये संपूर्ण वेळ पोटात वेदना होत असते आणि दैनंदिन काम करण्यातही अडचण येते. त्याची लक्षणे आणि उपचार जाणून घेऊया.

मेनोरेजियाची लक्षणे
मेनोरेजियामध्ये महिलांना दर तासाला पॅड बदलावे लागते. रात्री झोपतानाही पॅड बदलण्याची आवश्यकता असते. बर्‍याच वेळा अधिक रक्तस्त्राव रोखण्यासाठी एकाच वेळी दोन पॅड लावण्याची आवश्यकता असते. वेदनेमुळे कोणतीही कामे करण्यात अडचण येते. रक्तस्रावात रक्ताच्या गुठळ्या येतात. ७ दिवसांपेक्षा अधिक रक्तस्त्रावासह पिरियड्स येतात. या दरम्यान थकवा जाणवतो आणि श्वास घेण्यासही त्रास होतो.

काय असतो मेनोरेजिया?
मेनोरेजियामुळे एनिमियासह अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. एनिमियामुळे शरीरात रक्त कमी होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. या व्यतिरिक्त मेनोरेजियामुळे बर्‍याच गंभीर समस्या उद्भवतात.

हार्मोन्सच्या समस्यांमुळे
महिलांच्या युटरसमध्ये दरमहिन्याला एक थर तयार होतो, जो पिरियड्स दरम्यान रक्तस्त्रावाद्वारे शरीराबाहेर येतो. हार्मोन्सची पातळी खराब झाल्यावर हा थर खूप जाड होतो आणि त्यामुळे अधिक रक्तस्त्राव होतो. ओव्हॅल्युएट नसतानाही शरीरात हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो.

युटरस वाढणे
युटरसच्या थरामध्ये पॉलीप्स वाढू लागते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो. याशिवाय युटरसमध्ये फायब्रॉइड ट्यूमर झाल्यामुळेही महिलांना बराच काळ रक्तस्त्राव होतो.

गरोदरपणाशी संबंधित समस्या असल्यास
जेव्हा फर्टीलाइज्ड अंडे गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागते, तेव्हा त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. अशा प्रकारच्या गर्भधारणेत बर्‍याच समस्या येतात. यापैकी अति रक्तस्त्राव ही एक मोठी समस्या आहे.

कर्करोगामुळे
हे फार क्वचित घडते, परंतु गर्भाशयाच्या किंवा ओव्हरी कर्करोगामुळेही काही महिलांना अधिक रक्तस्त्राव होतो.

काही औषधांमुळे
शरीरात जळजळ आणि सूज कमी करणाऱ्या औषधांमुळे देखील हेवी पिरियड्स होतात.

मेनोरेजियाचा उपचार
अधिक रक्तस्त्राव होण्याच्या काही प्रकरणांमध्ये डॉक्टर गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. या औषधांमुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलते, ज्यामुळे अधिक रक्तस्त्राव कमी होऊ लागतो. डॉक्टर अधिक रक्तस्त्राव टाळण्यासाठी काही इतर औषधेही लिहून देऊ शकतात. ही औषधे तुम्हाला पिरियड्स दरम्यानही घ्यावी लागतील.

सर्जरी
जर तुमच्या शरीरात पॉलीप्स किंवा फायब्रॉईड आहे, तर डॉक्टर तुम्हाला सर्जरी करण्याचा सल्ला देखील सल्ला देऊ शकतात. शस्त्रक्रियेनंतर अधिक रक्तस्त्राव होण्याची समस्या थांबेल.

गर्भाशयाची स्वच्छता
डॉक्टर युट्रसवरून थर काढून स्वच्छता देखील करू शकतात. त्याची सर्वात सोपी प्रक्रिया म्हणजे डायलेशन आणि क्युटेरेज. यामुळेही अति रक्तस्त्राव थांबतो. काही महिलांना हे एकापेक्षा जास्त वेळा करावे लागते.

हिस्टेरेक्टॉमी
अति रक्तस्त्राव होण्याच्या गंभीर प्रकरणांमध्ये ही शस्त्रक्रिया आवश्यक असते. यासाठी गर्भाशय काढून टाकणे आवश्यक असते. यानंतर तुम्हाला पीरियड्स येणार नाहीत. तसेच गर्भधारणा पुन्हा शक्य नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like