Men’s Health | दीर्घकाळ आरोग्य कायम राखण्यासाठी ‘ही’ आहेत 5 पोषकतत्व, डाएटमध्ये ताबडतोब करा समावेश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Men’s Health | आजकाल खाण्यापिण्याच्या पद्धतीमुळे पुरूषांना आवश्यक पोषक द्रव्ये मिळत नाहीत. पुरुषांच्या पोषणसंबंधी गरजा स्त्रियांपेक्षा भिन्न आहेत. पुरुषांचे टेस्टोस्टेरॉन वाढण्यासाठी या 5 पोषक तत्वांची गरज असते (Men’s Health). आज आम्ही त्या 5 पोषक तत्वांचे स्त्रोत सांगणार आहोत, जे तुमचे मसल्स, हाडे, इम्युनिटी, पचन आणि मांडीच्या (Muscles, Bones, Immunity, Digestion, Thighs) ताकदीसाठी सर्वात प्रभावी ठरतात. जर तुम्ही चांगल्या डाएटच्या शोधात असाल तर या फायद्यांबद्दल आवश्यक माहिती घ्या (Super Healthy Diet)…

 

1. कॅल्शियम (Calcium)
दैनंदिन आहारात आपण इतक्या पौष्टिक गोष्टींचा समावेश करू शकत नाही. परंतु पुरुषांचे स्नायू आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची सर्वाधिक गरज असते. जर आकडेवारी आणि तथ्यांनुसार फक्त पुरुषांबद्दल बोलायचे तर एका दिवसात 20 ग्रॅम कॅल्शियम आवश्यक आहे. हे पूर्ण करण्यासाठी, आहारात दूध, दही, कच्चे पनीर, मासे, अंडी आणि हिरव्या भाज्या (Milk, Curd, Raw Paneer, Fish, Eggs, Green Vegetables) समाविष्ट करा.

 

2. झिंक (Zinc)
झिंक शरीराच्या अवयवांना बळकट करण्यास मदत करते. मस्कुलर बॉडीसाठी झिंकचे प्रमाण वाढवावे लागते, झिंकचा स्त्रोत बहुतांशी मांसाहारी पदार्थांमधून मिळतो, त्यामुळे शाकाहारी लोकांमध्ये झिंकची कमतरता असते. झिंक शरीरात संसर्ग पसरण्यापासून रोखते आणि जखमा भरण्यासाठी झिंकची सर्वाधिक गरज असते. यासाठी तुम्ही सीफूड, रेड मीट आणि बीन्सचा (Seafood, Red Meat, Beans) आहारात समावेश करा. (Men’s Health)

 

3. फायबर (Fibre)
पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी फायबरची गरज असते. लहानपणापासून आपण खूप वैविध्यपूर्ण पदार्थ खातो, म्हणूनच आज आपण इतके मजबूत दिसतो. पण आता जर आपण आहाराकडे दुर्लक्ष केले तर त्याचा परिणाम वाईट होऊ शकतो. फायबर हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहे, जर शुगरचा त्रास होत असेल तर दररोज फायबरयुक्त अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. ही कमतरता भरून काढण्यासाठी भाज्या, कडधान्ये, हंगामी फळे, बीन्स आणि अंडी यांचे सेवन करू शकता.

4. अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants)
लिंबू आणि संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे किटाणू मारण्यास मदत करतात आणि फ्री रॅडिकल्स शरीरापासून दूर ठेवतात. त्यात अनेक प्रकारचे फ्लेव्होनॉइड्स आणि जीवनसत्त्वे आढळतात. तुमच्या घरात आजी-आजोबा असतील तर त्यांनी रोज फळांचे सेवन करावे, यामुळे होणारे आजार दूर होऊ शकतात. यासाठी, भरपूर सुकामेवा, फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

 

5. पोटॅशियम (Potassium)
मांसाची मजबूती आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी पोटॅशियम सर्वात महत्वाचे आहे.
हे हृदय मजबूत करते आणि ब्लड फिल्टरसाठी प्रभावी आहे.
त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी एवोकॅडो, सुका मेवा, आंबट फळे आणि बटाटे (Avocados, Dried Fruits, Sour Fruits, Potatoes) खावेत.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Men’s Health | how to get rid from all body problem this 5 nutrition will help you out

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | शाळेतून घरी जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, निगडीतील भेळ चौकातील घटना

 

Gold Silver Rate | सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला, चांदी सुद्धा झाली स्वस्त; जाणून घ्या 1 तोळा सोन्याचा नवीन दर

 

Pune Crime | पॅनकार्ड, आधार कार्डचा वापर करुन काढले 90 लाखांचे कर्ज