Men’s Health | पुरुषांनी कधीही दुर्लक्ष करू नये या 5 लक्षणांकडे, आरोग्यासाठी धोका, जाणून घ्या

नवी दिल्ली : Men’s Health | बहुतांश पुरुष छोट्या-मोठ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. तसेच डॉक्टरांकडे जाणे टाळतात. मात्र, कधी-कधी हीच सामान्य लक्षणे गंभीर आजारात बदलतात, तेव्हा जीवघेणी सुद्धा ठरू शकतात. पुरुषांनी कोणत्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये ते जाणून घेवूयात. (Men’s Health)

1. लघवीची समस्या –

लघवीला अडचण येणे किंवा वेदना जाणवणे हे कॅन्सरचे लक्षण असू शकते. याकडे दुर्लक्ष करू नये. पन्नाशीच्या पुरूषांमध्ये ही लक्षण जास्त दिसतात. अशावेळी डॉक्टरांकडे जा.

2. शरीरावरील तिळामध्ये बदल –

तिळ किंवा मस यामुळे त्वचेचा कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. बहुतांश लोकांना यामध्ये झालेले बदल समजत नाहीत. तिळ किंवा मसचा आकार, रंग बदलल्यास डॉक्टरांकडे जा.

3. असामान्य गाठ –

जर तुमच्या प्रायव्हेट पार्टवर एखादी गाठ येत असेल तर याकडे लक्ष द्या. हे सुद्धा एकप्रकारचा कॅन्सरचे लक्षण आहे.
टेस्टीक्युलर कॅन्सर सामान्यपणे 15 ते 49 वर्षाच्या पुरूषांना होतो. वेदना, आकारात बदल झाल्यास डॉक्टरांकडे जा.

4. छातीत वेदना –

छातीत सतत वेदना होत असतील तर डॉक्टरांकडे जा. हा सुद्धा पोट किंवा घशाचा कॅन्सर, हृदयरोग किंवा हार्ट फेलचा संकेत असू शकतो.
छातीत होणार्‍या वेदनेच्या पॅटर्नकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

5. मूड आणि पर्सनालिटीमध्ये बदल –

मूडमध्ये बदल होणे डिप्रेशनचा सुद्धा संकेत आहे. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. यापाठीमागे इतरही कारणे असू शकतात.

हे देखील वाचा

Pune ACP Transfer | बारामतीहून आयुक्तालयात हजर झालेले ACP नारायण शिरगांवकर यांची पुणे शहरात ‘या’ ठिकाणी नियुक्ती

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,029 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Men’s Health | men health signs symptoms men regularly ignore can be fatal doctor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update