Menstruation Period | महिलांच मासिक पाळी चक्र बिघडण्याचं नक्की कारण काय? जाणून घेऊया सविस्तर माहिती..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महिलांना प्रत्येक महिन्यात मासिक पाळी (Menstruation Period) येते. मासिक पाळी म्हणजे महिलांच्या जीवनातील एक अविभाज्य भाग आहे. सामान्यत: 21 ते 35 दिवसांमध्ये मासिक पाळी येत असते. मासिक पाळी (Menstruation Period) दरम्यान वैज्ञानिकदृष्ट्या महिलांच्या शरीरामध्ये ही एक हार्मोनल प्रक्रिया असते. अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान अनेक दुखण्याला (Menstrual Pain Home Remedies) सामोरे जावे लागते. काही महिलांना कमी प्रमाणात त्रास होतो, तर कित्येक महिलांना मासिक पाळी दरम्यान प्रचंड अशा वेदनेला सहन करावं लागतं (Women Health).

 

मासिक पाळी (Menstruation Period) दरम्यान पोट दुखी (Abdominal Pain), पाठ दुखी (Back Pain), कंबर दुखी आणि शारीरिक दुखणे (Body Pain) यासारख्या समस्यांना सामोरे जावं लागतं. मासिक पाळी (Menstruation Cycle) दरम्यान होणाऱ्या दुखण्यामुळे महिलांना उठण्यापासून ते बसण्यापर्यंत सगळ्याच गोष्टी अवघड होऊन जातात. दुखणं (Period Pain) कमी होण्यासाठी महिला गरम पाण्याचा शेक घेतात. तसेच अनेक घरगुती उपाय करतात ज्याणे दुखणं कमी होण्यास मदत होईल (Menstruation Period).

 

अनेकदा महिलांच्या मासिक पाळीच चक्र (Menstruation Period Cycle) बिघडतं. माहितीनुसार मासिक पाळी बिघडण्यासाठी एक कारण अगदी महत्वाच असतं. ते म्हणजे ताणतणाव. तसेच रोजची बदलती जीवनशैली (Daily Lifestyle) आणि आहार (Diet) याचा देखील महिलांच्या मासिक पाळीवर तीव्र प्रमाणात परिणाम होतो. आपण जाणून घेऊया नक्की का बिघडतं मासिक पाळीचं चक्र (Why Does The Menstrual Cycle Get Worse)-

महिलांना बऱ्याचदा अनेक ताणतणावांचा (Stress) सामना करावा लागतो. तणावामुळं रक्तस्त्रावाचे (Bleeding) दिवस कमी किंवा जास्त होण्याची अतिप्रमाणात शक्यता असते, त्यामुळं पाळी (Monthly Period) चुकू शकते.

तसेच अनेक महिला पाळी पूढे ढकलण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात (Birth Period Medicines), त्यामुळे याचा परिणाम पाळीवर होतो आणि पाळीचे चक्र बिघडते.

वजन कमी, जास्त होणे याचा परिणाम महिलांच्या हार्मोन्सवर (Hormones Imbalance) होतो. याचा परिणाम मासिक पाळीच्या चक्रावर दिसून येतो.

मासिक पाळी थांबण्याच्या 10 वर्षं आधीपासूनच पाळी अनियमित येऊ शकते, त्याला रजोनिवृत्ती (Menopause) म्हणतात.

पीसीओडी (PCOD) आणि पीसीओएस (PCOS) मध्ये गर्भाशयात (Uterus) लहान लहान गाठी असतात, आणि त्याचा भयंकर असा परिणाम मासिक पाळीवर होतो.

पाळीच चक्र थायरॉइड ग्रंथीच्या (Thyroid) हर्मोन्स बदलामुळं सुद्धा बदलू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Menstruation Period | why does the menstrual cycle get worse

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

 

Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

 

Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या स्टडीमध्ये समोर आलेली माहिती