‘या’ कारणामुळं तब्बल 43 टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नवीन संशोधनातून समोर आली माहिती

नवी दिल्ली: पोलिसनामा ऑनलाईन – संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट ओढवले आहे. गेल्या ८ ते ९ महिन्यात लॉकडाऊन करण्यात आलं होत. यादरम्यान घरातच थांबावे लागले होते त्यामुळे आलेल्याला ताण तणावामुळे मानसिक आजार उद्भवले असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. या संशोधनातून ४३ टक्के भारतीय नैराश्याचा सामना करत असल्याचे समोर आले आहे. GOQii dware द्वारे स्मार्ट टेक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा फ़्लॅट फॉर्मच्या माध्यमातून एक संशीधन करण्यात आले होते त्यामध्ये १० हजारांपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग होता.

भारतीय नवीन संकटांचा सामन कसा करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर कसा परिणाम होत आहे याचा अभ्यास या संशोधनातून करण्यात आला होता. या संशोधनात २६ टक्के लोकांना हळूहळू नैराश्य येत होते. तर ११ टक्के लोक नैराश्याच्या मढल्ये टप्प्यात होते. ६ टक्के लोकांना नैराश्याची तीव्र लक्षणे दिसली. गेल्या काही महिन्यापासून अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे.

लॉकडाऊन, अति काळजी, बेरोजगारी, पगार कपात, अस्थिर वातावरणामुळे ताणतणाव वाढला. यामुळे जीवनशैलीत बदल झाला त्याचे रूपांतर नैराश्यात झाले. ४३ टाके भारतीय नैराश्याचं सामना करत असल्याचे या अभ्यासात म्हंटले आहे.