Mental Health | मेंदूवर थेट परिणाम करतात ‘या’ 4 चुकीच्या सवयी, तुम्हाला बनवू शकतात मनोरूग्ण; जाणून घ्या

नवी दिल्ली : तज्ज्ञ सांगतात की, मानसिक आरोग्य (Mental Health) शारीरीक आरोग्याएवढेच महत्वाचे आहे. मात्र काही अशा सवयी असतात ज्या मेंटल हेल्थवर वाईट परिणाम करतात. अशा सवयींमुळे अनेक लोक मानसिक (Mental Health) रोगाला बळी पडतात. मानसिक रोग मेंदूशी संबंधीत असतो. हा आजार व्यक्तीचे वागणे, विचार आणि समजण्याची शक्ती प्रभावित करतो. चिंता, तणाव, एखाद्या वस्तुचे जास्त व्यसन किंवा चुकीचे खाणे-पिणे यामुळे तो होऊ शकतो. यासाठी काही सवयींवर नियंत्रण ठेवले पाहिजे.

या सवयींमध्ये करा सुधारणा (improve these habits)

1. तणाव कमी करा (reduce stress)

तणावाचा मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. यासाठी तणावापासून दूर रहा.

2. स्वताला वेळ द्या (give time to yourself)

स्पर्धा, करियरच्या नादात अनेक लोक प्रचंड मेहनत करतात पण स्वताला वेळ देत नाहीत. सुटी न घेता काम
करतात. याचा मानसिक आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो. यासाठी स्वताला वेळ द्या. मेंदूला आराम द्या.

3. हेल्दी डाएट न घेणे (not having a healthy diet)

योग्य आहार न घेतल्याचा परिणाम थेट मानसिक आरोग्यावर होतो. आहारात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड, जांभुळ, हिरव्या पालेभाज्या इत्यादीचा समावेश करा.

4. योग्य प्रमाणात झोप न घेणे (not getting enough sleep)

झोप शरीरासाठी सर्वात लाभदायक आहे. रोज किमान 8 तास चांगली झोप घ्यावी. जे लोक कमी झोपतात, त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

हे देखील वाचा

PM Kusum Yojana | Fact Check : पीएम कुसुम योजना ! तुम्हाला देखील आलाय का ‘हा’ मेसेज? इथं जाणून घ्या ‘सत्य’ अन्यथा होईल मोठं नुकसान

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ED ची धाड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Mental Health | these bad habits have a direct effect on mental health these bad habits are the cause of madness insanity

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update