Coronavirus Lockdown : घरात बसून बसून लोक होतायेत ‘या’ गंभीर आजारांचे शिकार !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  कोरोना व्हायरसमुळं सध्या लॉकडाऊन आहे. कोरोनापासून जरी बचाव होत असला तर घरात बसून लोक अनके गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु हे खरं आहे. लोकांना अनेक प्रकारचे मानसिक स्वरूपाचे आजार होत आहेत.

या काळात अनेक लोक मानसिक आजारांशी झुंज देत आहे. डिप्रेशनच्या प्रकरणात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 200 दशलक्षपेक्षा जास्त भारतीय कोणत्या तरी मानसिक आजारानं ग्रस्त होत आहे. वेगळ्या कारणांमुळं लोक आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहेत. आपणही आत्महत्येच्या अनेक घटना ऐकल्या असतील. इंडियन सायकेट्रीक सोसायटीनं यासंदर्भात सर्वेक्षण केलं आहे. याबद्दल माहिती घेऊयात.

द लँसेटच्या एका रिसर्चनुसार, क्वारंटाईनमध्ये असताना मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ राहू शकतो. डिप्रेशन, पोस्ट ट्रॉमेटीक स्ट्रेस डिसॉर्डर अशा समस्या येऊ शकतात. सेफिल्ड आणि अलस्टर विद्यापीठानं अलीकडेच 200 लोकांवर रिसर्च केला होता. यात लोकांच्या बदलत्या मानसिकतेवर अभ्यास करण्यात आला.

या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या 96 टक्के लोकांनी सांगितलं की, रात्री झोपेतून जाग आली तर ते साबणानं हात धुतात. 70 टक्क्यांहून जास्त लोक म्हणाले, टॉयलेट पेपरपासून अनेक गोष्टींची जास्तीची खरेदी केली आहे.