हॉस्पीटलमध्ये डॉक्टरच्या जागेवर बसला ‘मनोरूग्ण’, करून टाकला लोकांचा ‘इलाज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातून एक असे प्रकरणं समोर आले, जेथे एक मनोरुग्ण थेट डॉक्टरांच्या खूर्चीवर जाऊन बसला. एवढेच नाही तर त्याने अनेक रुग्णांना तपासले आणि त्यांना औषधे देखील दिली. हा अनोखा प्रकार छतरपूरच्या जिल्हा रुग्णालयात घडला. येथे या मनोरुग्णाने अनेक रुग्णांचा उपचार करत त्यांना औषधे लिहून दिली. त्याने 12 पेक्षा जास्त रुग्णाचा उपचार केला.

अस्पताल में डॉक्टर की जगह बैठा मानसिक रोगी, कर दिया लोगों का 'इलाज'

रुग्णालयात ओपीडी वेळी गर्दी झाली होती आणि सर्व डॉक्टर रुग्णांना तपासण्यात व्यस्त होते. तेवढ्यात चेंबर नंबर 20 मध्ये रुग्णांची रांग लागली, विशेष म्हणजे या चेंबरमध्ये बसणारे डॉक्टर हिमांशु बाथम जागेवर उपस्थित नव्हते. तेवढ्यात लोकांनी पाहिले की आत बसलेले डॉक्टर रुग्णांना तपासत होते आणि औषधे लिहून देत होते.

अस्पताल में डॉक्टर की जगह बैठा मानसिक रोगी, कर दिया लोगों का 'इलाज'

जेव्हा सरकारी मेडिकलमध्ये एका मागोमाग एक लाल पेनाने लिहिलेल्या औषधांच्या चिट्या (प्रिसक्रिप्शन) येऊ लागल्या, ज्यावरील अक्षर कोणालाही कळत नव्हते. तेव्हा मेडिकलमधील एका व्यक्तीला संशय आला. त्यानंतर त्याने रुग्णालयात जाऊन चौकशी केली.

अस्पताल में डॉक्टर की जगह बैठा मानसिक रोगी, कर दिया लोगों का 'इलाज'

त्यांनी औषधे लिहून देणाऱ्या डॉक्टरांचा चेंबर नंबर विचारला, तेव्हा खऱ्या प्रकरणाचा खुलासा झाला. तेथे बसलेला एक मनोरुग्ण रुग्णांचा उपचार करत होता. रुग्णालय प्रबंधकांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा गोंधळ उडाला. त्यानंतर या मनोरुग्णाला चेंबरच्या बाहेर काढण्यात आले आणि अलर्ट जारी करण्यात आला.

अस्पताल में डॉक्टर की जगह बैठा मानसिक रोगी, कर दिया लोगों का 'इलाज'

जेव्हा या मनोरुग्णाला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की डॉक्टर नव्हते, रुग्णांची गर्दी झाली होती यामुळे मी उपचार करण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर या मनोरुग्णाने स्वत:ला दिल्ली एम्स रुग्णालयाचा डॉक्टर असल्याचे सांगितले आणि म्हणाला की मी शंभर टक्के डॉक्टर आहे, तपासून पहा.

अस्पताल में डॉक्टर की जगह बैठा मानसिक रोगी, कर दिया लोगों का 'इलाज'

जिल्हा आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सांगितला आहे. ते म्हणाले की यात ज्यांनी बेजबाबदारपणे काम केले असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या प्रकारानंतर हा मनोरुग्ण रुग्णालयाच्या परिसरात फिरताना दिसला. मीडियाशी त्याने फडाफड इंग्रजी बोलण्यास सुरुवात केली आणि आपल्याबद्दल माहिती दिली.

You might also like