‘या’ 5 कारणांमुळे सुद्धा येऊ शकतो ताप, मानसिक तणावही ठरू शकते निमित्त !

पोलिसनामा ऑनलाइन – ताप येणे या समस्येला अनेक कारणे असू शकतात. परंतु, नुकत्याच करण्यात आलेल्या काही संशाधनातून नवीन माहिती समोर आली आहे. या रिसर्चनुसार मानसिक तणावामुळे सुद्धा काही लोकांना ताप येऊ शकतो. मानसिक तणावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात, हे आजवर माहित होते परंतु ताप येण्याचा नवा खुलासा या रिसर्चमध्ये झाला आहे. जी व्यक्ती एखाद्या मानसिक तणावाने ग्रस्त असते, तिचे शारीरिक तापमान वाढते. ज्यामुळे तिला नेहमी ताप येऊ शकतो, असे या रिसर्चमध्ये म्हटले आहे.

संशोधनातील महत्वाचे मुद्दे

1 आजूबाजूचं तापमान वाढल्याने शरीराचं तापमानही वाढतं. अशावेळी मेंदूची एक ग्रंथी हायपो थॅलेमस जी शरीराची हीट रेग्युलेटरी सिस्टीमसारखं काम करते. खुपच उष्णता असल्यास या ग्रंथी कमजोर होऊन काम बंद करतात. अशा स्थितीत शरीराच्या तापमानाचं संतुलन बिघडतं. शरीरातून अनावश्यक उष्णता बाहेर येऊ शकत नाही तेव्हा शरीर अधिक गरम होऊ लागतं.

2 शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा असे होते. हे फार धोकादायक ठरू शकते. यास हायपर थर्मिया म्हणतात.

3 उंदरांवरील एका रिसर्चमधून समोर आले की, जेव्हा उंदराच्या मेंदूचं तापमान वाढते तेव्हा त्याच्या मेंदूत अनेक प्रकारचे बदल होतात. ब्राउस चरबी गरज असेल तेव्हा शरीराचं तापमान वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.

4 संशोधकांनी म्हटले आहे की, अनेक श्रोत्यांसमोर बोलण्यासाठी व्यासपीठवर जात असताना किंवा जाण्याची वाट बघता असताना काही लोकांचे हृदय अधिक वेगाने धडधडते. श्वास भरून येतो, ब्लड प्रेशर वाढते आणि हाताला घाम येऊ लागतो. या गोष्टींमुळेही शरीराचं तापमान वाढतं आणि ताप येऊ शकतो.

5 अनेकदा भावनात्मक तणाव सुद्धा अनेक प्रकारचा ताप येण्याचं कारण ठरतो. ते म्हणाले की, जर एखाद्याचं शरीर गरम असेल तर गरजेचं नाही की, त्याला ताप असेलच. हे हीट स्ट्रोक किंवा हायपर थर्मिया सुद्धा असू शकतं. हायपर थर्मियाला साधारण ताप समजणं फार मोठी चूक ठरू शकते.