लोकांवर प्राणघातक हल्ला करणारा मनोरुग्ण 5 दिवसात बरा झाला, नागरिकांकडून डाॅक्टरांचा सत्कार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील मिल्लत नगर भागात राहणारा शेख खदीर अनिस (वय 36) हा गेल्या एक वर्षापासून मनोरुग्ण असल्याने उपचार घेत होता. परंतु गेल्या तीन महिन्यापासून त्याने उपचार घेणे बंद केल्यामुळे 17 ऑक्टोबर रोजी अचानक त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याने तो लोकांवर प्राणघातक हल्ला करायचा.

या हल्ल्याची घटना स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिल्यानंतर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन त्या रुग्णाला उपचार कामी जिल्हा रुग्णालय बीड येथे दाखल करण्यात आले. दाखल करताच मनोरुग्ण तज्ञ यांनी त्याच्यावर तातडीचे उपचार सुरू केले. पाच दिवसांच्या उपचारानंतर तो  22 ऑक्टोबर रोजी बरा होऊन घरी जाण्यास तयार झाला आहे.

डॉक्टरांच्या कामगिरीबद्दल स्थानिक नागरिकांसह माजी नगरसेवक खुर्शीद आलम गफर कुरेशी, शेख जफर जुबेर कुरेशी, सय्यद नवीन मोमीन नेम, शेख रशीद यांनी आज रुग्णालयात जाऊन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठोड व मनोविकार तज्ञ डॉक्टर मुजाहेद यांचा सत्कार केला.

Visit : Policenama.com

You might also like