हॅलो, तू ‘लॉज’वर आलीस तरच मोबाईलमधील ‘ते’ फोटो डिलीट करेन, तरूणानं 24 युवतींना धमकावलं

नाशिक : पोलिसनामा ऑनलाईन : सोशल मीडियाचा काही तरुण चुकीचा वापर करतात. अशाच एक घटनेतून हे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावरून मुलींना धमकावून आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणे हे काही नवीन नाही परंतु ही विकृती दिवसेंदिवस वाढतच आहे. नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील एक तरुण महाविद्यालयीन तरुणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून अश्‍लिल मेसेज पाठवून भेटण्यासाठी धमकावत होता. त्याने आजपर्यंत २४ मुलींना धमकावले आहे. अखेर त्या तरुणास नाशिक सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्या तरुणाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे पोलिसांनी सांगितले.

सविस्तर माहिती अशी की, युवराज बाजीराव डुंबरे असे या संशयिताचे नाव असून पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी युवराज हा तिला व्हॉट्‌सअ‍ॅपवरून अश्‍लिल मेसेज पाठवत असे. आणि वारंवार असे मेसेज पाठवून त्याने तिचा विनयभंग केला. त्याने गेल्या रविवारी (ता. 8) रोजी पीडितेला मेसेज केला की माझ्याकडे तुझे फोटो आहेत आणि तू मला हॉटेलमध्ये भेटायला आलीस तरच फोटो डिलीट करेल असे धमकावले. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवराज बोरसे यांनी तत्काळ तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे युवराजला अटक केली. न्यायालयाने आरोपी युवराज यास २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अजून एक घटना औरंगाबाद येथे घडली असून संशयित आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेचा विनयभंग केला. पीडितेच्या फिर्यादीनुसार, पीडित तरुण आणि संशयित आरोपी हे एकमेकांना तीन वर्षांपासून ओळखत होते. आणि या ओळखीतूनच त्याने पीडितेचे फोटो, व्हिडीओ आपल्या मोबाइलमध्ये शूट केले आणि नंतर त्याने पीडितेला धमकावले की माझ्यासोबत लग्न केले नाही, तर फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल करेल. त्यानंतर त्याने पीडितेच्या भावाला आणि नातेवाईकांना तिचे फोटो व व्हिडीओ पाठविले. त्यानंतर पोलिसांत विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी संशयित तरुणाच्या शोधात आहेत. असे पोलिसांनी सांगितले.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/