Mera Bill Mera Adhikar द्वारे कसे जिंकू शकता १ कोटी रुपयांपर्यंत बक्षीस, जाणून घ्या पूर्ण पद्धत

नवी दिल्ली : Mera Bill Mera Adhikar | केंद्र सरकारने (Central Government) रिटेल आणि होलसेल व्यापाऱ्यांमध्ये जीएसटी बिलाची (GST Bill) प्रसार वाढवण्यासाठी मेरा बिल मेरा अधिकार (Mera Bill Mera Adhikar) स्कीम सुरू केली आहे. केंद्र सरकारने गुरुवारी या योजनेची घोषणा करताना सांगितले की, या माध्यमातून प्रत्येक तिमाहीत १-१ कोटींची दोन बंपर बक्षिसे दिली जातील. त्याच बरोबर १०-१० हजार ते १०-१० लाख रुपयांपर्यंतची अनेक बक्षिसे देखील सहभागींना दिली जातील. ही योजना १ सप्टेंबर २०२३ पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे.

१० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत बक्षिस
या विशेष योजनेची माहिती देताना अर्थ मंत्रालयाने म्हटले की, दरमहा वस्तू आणि सेवा कर (GST) बिल अपलोड करणाऱ्यांपैकी ८०० लोकांना १०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. १० भाग्यवान लोक असतील ज्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. बंपर बक्षीस तिमाही आधारावर काढले जाईल. या बंपर बक्षीसाचा लाभ तिमाहीत अपलोड केलेल्या कोणत्याही बिलाच्या सहभागी व्यक्तीला दिला जाऊ शकतो.

स्कीममध्ये मिळेल हा लाभ
मेरा बिल मेरा अधिकार योजना यासाठी आणली आहे की, ग्राहक मोठ्या संख्येने व्यापाऱ्यांकडे जीएसटी बिलाची मागणी करतील, जेणेकरून त्यांना योजनेत सहभागी होता येईल. यामुळे व्यापाऱ्यांना बिल देणे क्रमप्राप्त होईल, आणि केंद्र सरकारला यातून मोठा महसूल मिळेल.

ग्राहकांनी जीएसटी बिले किंवा इनव्हॉइस गोळा करण्यास सुरूवात केल्यावर अधिकाधिक जीएसटी इनव्हॉइस तयार झाल्याने व्यावसायिक कर चुकवू शकणार नाहीत. त्यामुळे सरकारच्या महसुलात वाढ होईल. ही योजना आसाम, गुजरात, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमन आणि दीवसाठी सुरू करण्यात आली आहे.

मेरा बिल मेरा अधिकार योजनेचा लाभ घेण्यासाठी, अपलोड केलेल्या इनव्हॉइसमध्ये जीएसटीआयएन (GSTIN) इनव्हॉइस क्रमांक, भरलेली रक्कम, कराची रक्कम, इनव्हॉइस तारीख आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचे नाव प्रविष्ट करणे
आवश्यक आहे.

बिल कसे अपलोड करायचे

  • यासाठी ‘मेरा बिल मेरा अधिकार’ अ‍ॅप अँड्रॉईड आणि आयओएस वरून डाउनलोड करा.
  • याशिवाय web.merabill.gst.gov.in वर देखील भेट देऊ शकता.
  • किमान २०० रुपयांचे बिल अपलोड करता येईल.
  • यूजर एका महिन्यात जास्तीत जास्त २५ बिले अपलोड करू शकतो.

विजेत्यांना दाखवावी लागतील ही कागदपत्रे –

अर्थ मंत्रालयाने माहिती दिली की, ज्या विजेत्यांना पारितोषिक मिळेल त्यांना पॅन नंबर, आधार कार्ड, बँक खात्याचे
तपशील मेरा बिल मेरा अधिकार अ‍ॅपवर अपलोड करावे लागतील. ही सर्व माहिती बक्षीस जाहीर झाल्यापासून ३०
दिवसांच्या आत देणे आवश्यक आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kartikey Malviya – Ragini | अभिनेता कार्तिकेय मालवीयाचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण, सचिन कांबळे दिग्दर्शित ‘रागिनी’ गाणं प्रदर्शित!