Mera Ration App | रेशन दुकान बदलायचं आहे? मग, ‘मेरा रेशन’ ॲप करा डाऊनलोड; जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Mera Ration App | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) कोरोनाच्या काळामध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ (Ration Card) योजनेला सुरूवात केली आहे. याचबरोबर त्या संलग्न ‘मेरा रेशन’ (Mera Ration App) या स्वतंत्र ॲपची देखील सुरूवात केली आहे. मेरा रेशन या स्वतंत्र ॲपच्या माध्यमातून लोकांची बहुतांश सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहे. त्यामुळे स्थलांतरीत नागरीकांना या ॲपचा भरपूर उपयोग होणार आहे.

 

रेशन कार्ड स्थलांतर केल्यानंतर तुम्ही कोणत्या धान्यासाठी पात्र आहात, तुमच्या लगतच्या परिसरातील रेशन दुकानाचा पत्ता ही माहिती देखील घरबसल्या तुम्हाला मिळणार आहे. दरम्यान, मेरा रेशन ॲप लोकांच्या सोयीचे असून, लोकांना घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नव्या रेशन कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करणे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास रेशन कार्ड ट्रान्स्फर करणे, आपल्या परिसरातील रेशन दुकान कोठे आहे, आदी माहिती घरबसल्या मिळणार आहे.’ अशी माहिती पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (District Supply Officer Surekha Mane) यांनी दिली आहे.

 

दरम्यान, ‘मेरा रेशन’ ॲपवर (Mera Ration) आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात, सुविधा केंद्रात हेलपाटे मारण्याची गरज लागणार नाही.

 

कसे करायचे ॲप डाऊनलोड?

– केंद्र शासनाने सध्या अँड्राॅइड स्मार्टफोनसाठी ‘मेरा रेशन’ मोबाईल ॲप सुरू केले आहे.

– हे ॲप प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे.

 

Web Title :- Mera Ration App | how change ration shop apply mera ration app ration card

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा