Ration घेणाऱ्यांसाठी मदत करतंय ‘हे’ ऍप, घरबसल्या करा रेशनसंबंधी कामे; वितरकही येणार बदलता, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने ‘मेरा राशन ऍप’ लाँच केले आहे. या ऍपच्या मदतीने राशन घेताना मोठी मदत होणार आहे. हे ऍप कंज्युमर अफेअर्स मंत्रालयाने लाँच केले आहे. या मंत्रालयांतर्गत धान्य वितरण प्रणालीवर काम करते. राशनचे वितरण पीडीएसच्या माध्यमातून केले जाते. दुकानाच्या खेपा मारणे यामुळे आता वाचणार आहे.

केंद्र सरकारने ‘वन नेशन वन राशन कार्ड’ (ONORC) सुरु केले आहे. त्यानुसार कंज्युमर अफेअर्स मंत्रालयाने हे ऍप लाँच केले आहे. काही लोक नोकरीनिमित्त राज्य बदलत असतात. प्रवासी मजूरही कामासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतात. त्यामुळे आता सरकारने वन नेशन वन राशनकार्ड योजनेला सुरुवात केली आहे.

राशनची पूर्ण माहिती मिळणार

या मोबाईल ऍपमध्ये राशनकार्डची माहिती नोंदवण्यात आल्यानंतर ती माहिती तुम्ही डाऊनलोडही करू शकता. राशनकार्डशी आधार लिंक आहे की नाही, हेही पाहू शकता. राशनकार्डवर किती वितरण झाले आहे आणि तुमच्या घराजवळ किती राशन डिलर्स आहेत याचीही माहिती तुम्हाला मिळू शकते. ही पूर्ण सिस्टिम गुगल मॅप्सने जोडली गेली आहे.

मोबाईलमध्ये कसे घ्यावे आधारकार्ड

सर्वात आधी गुगल प्ले स्टोअरवरून ‘मेरा राशन’ मोबाईल डाऊनलोड करावे. मोबाईलमध्ये रजिस्ट्रेशन करण्याचा पर्याय दिला जातो. जर तुम्ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेला असाल तर तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन करून राशनचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही राशन कार्डचा नंबर टाकणे गरजेचे आहे. तसेच नंबर टाकल्यानंतर राशनकार्ड संबंधित सर्व माहिती दिसू शकेल. तुमचा आधारक्रमांकही तिथे दिसेल.

लिंक करणेही सोपं

तुम्हाला तुमचे राशनकार्ड वन नेशन वन राशनकार्ड या योजनेंतर्गत आहे की नाही याचीही माहिती घेता येऊ शकते. मोबाईल ऍपमध्ये एलिजिबिलिटीचा पर्याय दिला जातो. पण आधारकार्डशी क्रमांक जोडला नसला तरीही अगदी सोप्या पद्धतीने जोडला जातो. तसेच तुम्ही नंबर टाकल्यानंतर तुम्हाला समजेल की या योजनेंतर्गत तुमचे राशन येते की नाही. ऍपमध्ये आधार सीडिंगची सुविधा दिली जाते. जर तुमचा आधारक्रमांक राशन कार्डला लिंक नसेल तर तुम्ही सहजपणे लिंक करू शकता.