ग्राहकांच्या समोर मंदीनं ‘हार’ पत्कारली, एका दिवसात विकल्या गेल्या 200 अलिशान कार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर्मनीची लग्जरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज बेंझने सणासुदीच्या एकाच दिवसांत 200 कार डिलिव्हरी देण्याचा विक्रम केला आहे. मंगळवारी कंपनीने दसरा आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबईमध्ये 125 आणि गुजरातमध्ये 74 गाड्यांची डिलिव्हरी दिली.

ग्राहकांनी दाखवला उत्साह
यावेळी मर्सिडीज बेंज इंडियाचे एमडी-सीईओ मार्टिन श्वेंक यांनी बोलताना सांगितले कि, दसरा आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर मुंबई, गुजरात आणि इतर ठिकाणी देखील ग्राहकांनी मोठा उत्साह दाखवला असून मागील वर्षी देखील असाच उत्साह दाखवला होता.

या गाड्यांची झाली विक्री
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, C-क्लास , E-क्लास सेडान , GLC आणि GLE या प्रकारांमधील गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. साध्य कंपनी नवीन मॉडेल लाँच करण्याच्या प्रयत्नात आहे.

सणासुदीला विक्री वाढण्याची अपेक्षा
मर्सिडीज बेंज बरोबरच अन्य कार उत्पादक कंपन्यांना देखील विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. नवनवीन ऑफर्समुळे या कंपन्यांना देखील फायदा होण्याची शक्यता आहे. या वर्षी दिवाळी 27 ऑक्टोबर रोजी असून धनत्रयोदशीला देखील नागरिक मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसून येणार आहेत.

Visit : Policenama.com