Mercedes-Maybach GLS 600 भारतात झाली लाँच, अवघ्या 4.9 सेकंदमध्ये पकडते 100 kmph चा वेग

नवी दिल्ली : वृत्त संस्था – Mercedes-Maybach GLS 600 भारतात लाँच झाली आहे. मर्सिडीज बेंझ इंडियाने आपल्या या फ्लॅगशिप एसयूव्हीचे नवीन व्हेरिएंट भारतीय बाजारात 2.43 कोटी रुपयांच्या प्रारंभीच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केले आहे. कंपनी तिची विक्री कम्प्लीट बिल्ट युनिट (सीबीयू) द्वारे भारतात करणार आहे. जर्मनीच्या या दिग्गज कार निर्मिती कंपनीचे लक्ष्य आहे की ते या वर्षी भारतात आपले 15 नवीन मॉडल लाँच करतील. याच पार्श्वभूमीवर Mercedes-Maybach GLS 600 लाँच करण्यात आली आहे.

भारतीय बाजारात Mercedes-Maybach GLS 600 ची थेट स्पर्धा Bentley Bentayga, Rolls-Royce Cullinan आणि Land Rover Range Rover Autobiography सारख्या प्रीमियम कार सोबत होईल.

Mercedes-Maybach GLS 600 च्या डायमेन्शनबाबत बोलायचे तर तिची लांबी 5205 मिलीमीटर, रूंदी 2157 मिलीमीटर आणि उंची 1838 मिलीमीटर आहे. तिचा व्हीलबेस 3135 मिलीमीटर आणि रियर लेगरूम 1103 मिलीमीटर आहे. या प्रीमियम कारचे ग्रोस वजन 3250 किलोग्रॅम आहे.

File photo

Mercedes-Maybach GLS 600
Mercedes-Maybach GLS 600 4Matic मध्ये पॉवरसाठी 4.0-लीटरचे व्ही8 बाय-टर्बो इंजिन दिले आहे.तिचे इंजिन 542 बीएचपीची मॅक्झिमम पॉवर आणि 730 एनएमचा पीक टॉर्क जेनरेट करते.
तिचे इंजिन 9जी-ट्रॉनिक ऑटोमॅटिक ट्रान्समिशनयुक्त आहे.
तिचे इंजिन 48-वोल्ट सिस्टम अ‍ॅट बूस्ट सिस्टमने युक्त आहे,
जे यामध्ये अतिरिक्त 250 एमएमचा पीक टॉर्क आणि 21 बीएचपीची मॅक्झिमम पॉवर जेनरेट करते.

ही कार वेगाच्या बाबतीत सुद्धा जबरदस्त आहे.
अवघ्या 4.9 सेकंदात 0-100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते.
यामध्ये 250 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड मिळतो.
यामध्ये 4-सीटर आणि 5-सीटरचा पर्याय आहे.
फीचर्समध्ये कारमध्ये रुंद डिस्प्लेचा इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि मीडिया डिस्प्ले, 12.3-इंचाच्या दोन स्क्रीन स्टँडर्ड मिळतील,
ज्या लेटेस्ट एमबीयुएक्स इन्फोटेनमेंट सिस्टमसहहे मर्सिडिस व्हॉईस कमांड सिस्टम आणि मर्सिडिस मे कनेक्टेड कार टेक सारखी फीचर्स आहेत.

हे देखील वाचा

Pune Crime News : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू, विमानतळ परिसरातील घटना

चालत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची गळा चिरून हत्या, प्रियकरानं जेलमध्ये घेतला गळफास

भाजपचा CM ठाकरेंवर निशाणा, म्हणाले – ‘झेपत नाही, कळत नाही, वसुलीपुढे सरकत नाही, सतत मागत राहता, …यांना राष्ट्रीय जावई का म्हणू नये?

तसेच फेसबुक पेज ला लाईक करा

 

ट्विटर ला देखील फॉलो करा