खळबळजनक ! दाऊद इब्राहिमवर ‘काॅमेडी’ चित्रपट बनवणाऱ्या ‘त्या’ व्यापाऱ्याची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कॉमेडी चित्रपट बनवणारे व्यापारी विनोद रामाणी यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी गळफास लावून राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. ते नागपूरमधील नामांकित औषध व्यापारी होते. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम तपासात सोमर आले आहे.

रामाणी यांची पत्नी आणि मुलं बाहेरगावी गेले असताना त्यांनी किर्ती आपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. हे त्याच दिवशी कोणाच्या लक्षात आले नाही. काही दिवसांनी परिसरातील लोकांना वास येऊ लागला. त्यानंतर लोकांनी पोलीसांना बोलावून सांगितले, तेव्हा रामाणी यांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. पोलीसांनी यावर तपास केलातर त्यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथम तपासात समजले.

विनोद रामाणी हे नागपूरातील नामांकित व्यक्तीमत्त्व आहे. त्यांनी औषध विक्रीच्या क्षेत्रात प्रचंड यश मिळवले आहे. एपेक्स मेडिकल स्टोर्स हे शहरातील मोठे औषध विक्रीचे दुकान आहे. तसंच रामाणी यांची नागपूरात अजून पाच दुकाने आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा डोंगर कसा झाला असेल असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

२ वर्षांपूर्वी रामाणी यांनी चित्रपट निर्मीतीच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी कॉफी विथ दाऊद हा चित्रपट केला. मात्र तो चित्रपट आल्यानंतर त्यांच्यावर दाऊदच्या लोकांकडून दबाव टाकण्यात आला. काही सीन्स काढण्याबाबत त्यांच्यावर धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे त्यांनी या संदर्भात पोलीसांत तक्रारही केली होती. मात्र हा चित्रपट पडला. बॉक्सऑफिसवर जास्त कमाई करण्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला, असं म्हणण्यात येते.

दरम्यान, रामाणी हे नागपूरातील नामांकित आणि श्रीमंत व्यापारी होते त्यामुळे त्यांना छोटे-मोठे कर्ज परवडणारे होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे फक्त कर्ज हेच कारण आहे का, अशी शंका येत आहे. त्यामुळे पोलीसांनी याचा तपास चांगला करावे आणि सत्य समोर आणावे, अशी मागणी नागपूरच्या व्यापारी वर्गाने केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

Loading...
You might also like