17 डिसेंबरला बुध करणार धनु राशीत प्रवेश, जाणून घ्या 12 राशींवर कसा होणार परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – युवराज चंद्रपुत्र बुध वृश्चिक राशीचा प्रवास समाप्त करून 17 डिसेंबरला दुपारी 11.35 वाजता धनु राशीत प्रवेश करीत आहे. या राशीमध्ये तो 4 जानेवारीपर्यंत राहील. त्यानंतर मकर राशीत प्रवेश करेल. त्याच्या राशी परिवर्तनाचा सर्व 12 राशींवर कसा परिणाम होईल याचे ज्योतिष विश्लेषण…

मेष
राशीत भाग्य स्थानात बुधचा प्रवेश आणि तेथे अगोदरच सूर्याची उपस्थिती असणे, हा दोन्ही ग्रहांचा योगायोग तुमच्यासाठी मोठ्या यशाची मालिका सुरू करेल. जसे यश हवे तसे प्राप्त करू शकता. परदेशी कंपनीत नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छूक असाल तर त्या दृष्टीकोनातून ग्रहाचे गोचर फार अनुकूल आहे. शिक्षण स्पर्धेतही चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ
राशीत अष्टम स्थानात दोन ग्रहांची युती तुमच्या मानसन्मात वाढतर करेलच, पण कार्यक्षेत्रात षडयंत्रात फसवू सुद्धा शकते, म्हणून सावधगिरी बाळगा. एखादा सरकारी सन्मान किंवा पुरस्काराची सुद्धा घोषणा होऊ शकते. जमीनीसंबंधित बाबींमध्ये अडचणी येऊ शकतात. आर्थिक तंगीपासून जपा. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा.

मिथुन
राशीत सप्तम स्थानात होत असलेला बुधादित्य योग तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. यासाठी आपल्या ऊर्जाशक्तीचा पूर्ण वापर करत काम आणि व्यापारात प्रयत्नशील राहिलात तर यशाची शक्यता सर्वाधिक राहील. विवाहाची चर्चा यशस्वी होईल. कुटुंबात मंगलकार्याचे सुद्धा क्षण येतील. संततीसंबंधी चिंतेतून मुक्ती मिळेल.

कर्क
राशीत सहाव्या स्थानात सूर्य आणि बुधाचे मिलन कोर्ट कचेरीच्या प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने आणण्यात मदत करेल. आरोग्य विशेषकरून पोटासंबंधी विकार, त्वचारोग याबाबत सावध राहा. कुणालाही जास्त पैसे उधार देऊ नका, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रवासाचा लाभ मिळेल. फिरण्यावर जास्त खर्च होईल.

सिंह
राशीत पंचम स्थानात बुध शिक्षण स्पर्धेत चांगले यश देईल. प्रेमसंबंधात सुद्धा मजबूती येईल. प्रेमविवाह करायचा असेल तर संधी अनुकूल आहे, लाभ घ्या. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तसेच भावांशी मतभेद वाढू देऊ नका. केंद्र अथवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये प्रलंबित कामे मार्गी लागतील.

Advt.

कन्या
राशीत चतुर्थ स्थानात बुधचे गोचर घर, वाहनसंबंधी संकल्पपूर्ती करेल. मित्र तसेच आप्तांकडून मदतीची अपेक्षा करू शकता, परंतु प्रवासात सावधगिरी बाळगा. समान चोरी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. नवीन व्यापार सुरू करायचा असेल अथवा कारारावर हस्ताक्षर करण्यासाठी सुद्धा वेळ खुप चांगली आहे.

तुळ
राशीत पराक्रम स्थानात बुधाचे गोचर तुम्हाला अति उत्साही आणि महापराक्रमी बनवेल. जो निर्णय घ्याल त्यामध्ये पूर्णपणे यशस्वी व्हाल. धर्म-कर्माच्या प्रकरणात आवडीने सहभागी व्हाल आणि दानधर्म सुद्धा कराल. परदेशी नागरिकत्वासाठी केलेला अर्जसुद्धा यशस्वी होईल. जे लोक तुमच्याविरोधात षडयंत्र करत होते, ते तुम्हाला मदत करतील.

वृश्चिक
राशीत धनस्थानात बुधादित्य योग तुमची आर्थिक बाजू खुप मजबूत करेल. पगाराची थकबाकी असेल तर ती सुद्धा येईल. अनेक दिवसांपासून सुरू असलेला तणावसुद्धा कमी होईल. आपली वाणी आणि कौशल्य आणि सौम्य स्वभावाच्या बळावर विषम स्थितीवर विजय प्राप्त कराल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.

धनु
राशीत झालेला बुधादित्य योग तुमच्यासाठी सर्वाधिक लाभदायक सिद्ध होईल. आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरीत पदोन्नती, मानसन्मानात वाढ होईल. केंद्र अथवा राज्य सरकारच्या विभागांमध्ये नोकरीसाठी अर्ज करणार असाल तर संधी अनुकूल राहील. संतती संबंधी चिंतेतून मुक्ती मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षण स्पर्धेत चांगले यशप्राप्तीचे योग आहेत.

मकर
राशीत व्ययस्थानात बुधाचे गोचर जास्त धावपळ आणि खर्च करायला लावेल. आर्थिक तंगीपासून सुद्धा बचाव करावा लागेल. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात अथवा वाद बाहेरच सोडवले तर चांगले राहील. घर अथवा वाहन खरेदीचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज करण्यासाठी चांगली संधी आहे.

कुंभ
राशीत लाभ स्थानात बुधाचे गोचर प्रत्येक प्रकारच्या यशाचे सातत्य वाढवेल. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्त्रोत तयार होतील, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य तसेच मोठ्या भावांशी मतभेद होऊ देऊ नका. विद्यार्थी अथवा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रह गोचर आणखी अनुकूल आहे.

मीन
राशीत दशम स्थानात होत असलेला बुधादित्य योग तुमच्यासाठी प्रत्येक दृष्टीने मान सन्मान आणि यशात वाढ करणारा आहे. सामाजिक पद-प्रतिष्ठा वाढेल, सोबतच मोठ्या लोकांशी संबंध वाढतील. आपले धैर्य आणि धाडसाच्या बळावर विषम स्थिती सुद्धा सामान्य कराल. जमीन, मालमत्तेशी संबंधीत प्रकरणे निकाली निघतील. घर, वाहन खरेदीचा सुद्धा योग आहे.