‘साहित्य संमेलना’च्या व्यासपीठावर परिसंवादादरम्यान ‘गोंधळ’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबादच्या साहित्य संमेलनाच्या मंचावर परिसंवादादरम्यान गोंधळ झाल्याची माहिती आहे. धर्माच्या मुद्द्यावरून खटके उडाल्याचे समजत आहे. साहित्य संमेलनात बुवाबाजीचं प्रस्थ वाढलं आहे का ? यावर परिसंवाद होता. यावेळी हिंदू धर्मातील कुप्रथावरच तुम्ही का बोलत असता असं म्हणत काहींनी थेट स्टेजवर धाव घेतली. यानंतर हा परिसंवाद बंद पडण्यात आला.

तुम्ही असे बोलत आहात तर आम्हालाही आमची बाजू मांडण्याची संधी द्या असं त्या गोंधळ घालणाऱ्यांनी म्हटलं आहे. परंतु याची पार्श्वभूमी काहीशी वेगळी असल्याचं बोललं जात आहे. कारण संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची जी निवड झाली आहे ती काहींना मान्य नाही त्यामुळे पहिल्या दिवसापासून दिसत होतं की, साहित्य संमेलनात काही ना काही विघ्न आणलं जाणार आहे. आज काहीसं होईल याचा अंदाज होताच असंही म्हटलं जात आहे.

परिसंवादादरम्यान जवळपास 5 ते 7 मिनिटे गोंधळ झाला होता. ज्यांनी परिसंवाद बंद पाडला त्यांनी स्टेजवरून खाली खेचण्यात आलं. विशेष बाब अशी की, यावेळी कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता. परंतु काही खासगी सुरक्षा रक्षक आणि संयोजन समितीने मिळून गोंधळ घालणाऱ्यांना खाली खेचलं आणि परिसंवाद पुन्हा सुरू झाला.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/