Facebook वर WhatsApp, Instagram एकत्र येणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फेसबुक आपल्या युजर्ससाठी नववीन फिचर्स आणत आहे. फेसबुक सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्म युनिफाईड करण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर इन्स्टाग्राम, मेसेंजर आणि व्हॉट्सअ‍ॅप हे एकत्र येणार आहे. काही दिवसांपूर्वी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने अशा पद्धतीने प्लॅटफॉर्मचा विचार सुरू असल्याचे म्हटले होते. मात्र आता त्या दृष्टीने फेसबुकने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे.

अ‍ॅप्लिकेशन रिसर्चर जेन मांचुन वांग यांनी याबाबतचे काही स्क्रिनशॉट्स शेअर केले आहेत. ज्यामध्ये मेसेंजर फंक्शन फेसबुक अ‍ॅपमध्ये अ‍ॅड झाल्याचे दिसत आहे. शेअर करण्यात आलेल्या या स्क्रिनशॉट्समध्ये फेसबुक अ‍ॅप विंडोच्या उजव्या कोपऱ्यात मेसेंजरचा आयकॉन दिसत आहे. यावर टॅप केल्यास फेसबुकची कॉन्टॅक्ट लिस्ट दिसते. मेसेंजर अ‍ॅपप्रमाणेच येथून मसेज करण्याची सुविधा मिळत आहे.

इंटीग्रेटेड फेसबुक चॅट हे नवे फीचर मल्टीमीडिया बेल्सशिवाय सिंपल चॅट सॉर्ट करेल. तसेच इमोजीचा वापर ही करता येईल अशी माहिती मिळत आहे. जर कोणत्या युजरला व्हिडीओ अथवा व्हॉईस कॉल, फोटो पाठवून इच्छित असतील तर त्यांना मेसेंजर अ‍ॅप वेगळा डाऊनलोड करावा लागणार आहे. मात्र, हे फीचर अजून अपडेट करण्यात आलेले नाही. फक्त काहीच युजर्सनी ते पाहिले असल्याचे वृत्त एका हिंदी वृत्तपत्राने दिले आहे.

Loading...
You might also like