अलर्ट ! महाराष्ट्रासह ‘या’ 5 राज्यात ‘मुसळधार’ पावसाची दाट शक्यता, ‘गारपीठ’ पडू शकते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हवामानात सतत बदल होत आहे, मार्च महिना संपत आला आहे पण तरीही अजून देशातील बऱ्याच भागात पूर्णपणे थंडीचे वातावरण कमी झालेले नाही, देशातील काही राज्यात पाऊस पडल्याने अजूनही थंडी आहे, यामुळे लोकांना खूप समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हरियाणा आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळ फिरत असल्याने हवामानातील हा बदल पाहायला मिळत आहेत.

मुसळधार पाऊस आणि गारपीठ होण्याचा अंदाज

ताज्या अंदाजानुसार, आज देशातील बर्‍याच राज्यात मुसळधार पाऊस आणि गारपिठीची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे की, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक भागात आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार मध्यप्रदेशच्या शाजापूर, उज्जैन, विदिशा, जबलपूर, खंडवा, खरगोन, मंडला, नरसिंगपूर, रायसेन, राजगड, सागर, सीहोर, सिवनी, बालाघाट, बैतूल, भोपाळ, छिंदवाडा, दमोह, देवास, धार, गुना, हरदा, होशंगाबाद , इंदूरमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

राजस्थान आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

तसेच राजस्थान आणि महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, ललितपूर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये येत्या १२ तासांत पाऊस आणि गारपीठ होऊ शकते.

दिल्ली-एनसीआरमध्ये देखील पाऊस व गारपीठ

तसेच दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस व गारपीठ होण्याची शक्यता असून येत्या २४ तासांत देशातील बहुतेक भागात हवामान कोरडे राहील, परंतु आसाम आणि अरुणाचल प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दिवसा आणि रात्रीच्या तापमानात होईल वाढ

त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली-एनसीआर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये दिवसा-रात्री तापमान वाढताना दिसून येईल.