‘या’ कारणामुळं अहमद पटेलांनी नितीन गडकरींची भेट घेतली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यातील विधानसभेचे निकाल लागून जवळपास 12 दिवस होऊन गेले आहेत. परंतू राज्यातील सत्तापेच वाढत चालला आहे. असे असताना दरम्यान दिल्लीत काँग्रेसचे अहमद पटेल आणि भाजप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट झाली. सकाळी 10 वाजताच्या सुमारास पटेल गडकरींची भेट घेण्याकरिता दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. राज्यातील सत्तापेचावर उतारा मिळावा म्हणून या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. परंतू या भेटीचा राज्यातील राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचे खुद्द अहमद पटेल यांनी स्पष्ट केले.

https://twitter.com/ANI/status/1191948820143312897

अहमद पटेल यांना सोनिया गांधींचे निकटवर्तीय समजले जातात. खरंतर काँग्रेसचे अनेक निर्णय पटेल यांच्या सल्लाने घेतले जातात. त्यामुळे राज्यातील राजकीय पेच सोडवण्यासाठी ही भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू आपण गडकरी यांची भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडकरींच्या भेटीनंतर पटेल यांनी कारण स्पष्ट केले. मी शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेतली. ही राजकीय बैठक नव्हती. महाराष्ट्रातील राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा झाली नाही.

राज्यात सत्ता स्थापनेवरुन चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत यांनी दावा केला की राज्यात भाजप सत्ता स्थापन करु शकत नसेल तर शिवसेना सत्ता स्थापन करेल. असे सांगण्यात येत असले तरी शिवसेना संख्याबळाच्या जमवाजमवीसाठी काँग्रेसवर आधारित आहे. परंतू आता पटेल आणि गडकरी यांची चर्चा झाल्याने राज्यातील राजकीय परिस्थिती काय असणार हे कोडे निर्माण झाले आहे.

Visit : Policenama.com