आकाशातून आगीचा गोळा कोसळल्याने सर्वत्र ‘धूरच-धूर’, जीव वाचविण्यासाठी लोक ‘सैर-भैर’ पळाले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात आकाशातून जोरदार आवाज येऊन एक आगीने धकधकता गोळा शेतात कोसळला. यानंतर सर्वत्र फक्त धूर धूर पसरला. यानंतर शेतात काम करणारे शेतकरी येथून पळाले. धूर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या गोळ्याची पाहणी केली. या आगीच्या गोळ्याने जमिनीला मोठा खड्डा पडला होता. हा दगड एका बॉलच्या आकाराचा होता आणि अत्यंत तापलेला होता.

ही माहिती सर्वत्र वेगाने परसली. त्यानंतर ही माहिती प्रशासनाला देण्यात आली. तपासणी नंतर स्पष्ट झाले की ज्याला शेतकरी एक दगड समजत होते तो एक उल्काचा गोळा होता. यावर बोलताना मधुबनीचे डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट श्रीसात कपिल अशोक यांनी सांगितले की ज्या वेळी उल्काचा गोळा शेतात कोसळला तेव्हा शेतकरी शेतात काम करत होते. आकाशातून वेगाने येण्याने त्याचा आवाज मोठा होता, या आवाजामुळे गावात दहशत पसरली होती.

चमकदार उल्का –
अशोक यांनी सांगितले की, उल्काच्या गोळ्याची चुबंकीय असणे ही विशेषता आहे. हा उल्का थोडा चमकदार आहे. याचे वजन १५ किलो आहे. याची माहिती मिळवण्यासाठी तेथे पोहचलेल्या वैज्ञानिकांनी सांगितले की, उल्का पडल्याने जमिनीला खड्डा पडला आहे याची तपासणी होईल. त्यानंतर उल्काला पटनाला पाठवण्यात आला. तेथे हा उल्का पटनाच्या म्यूजिअममध्ये ठेवण्यात आला. याची पाहणी नितिश कुमार यांनी केली, वैज्ञानिक या संबंधित माहिती जमा करत आहे.

याआधी २०१६ मध्ये देखील असा दावा करण्यात आला की एका बस ड्रायवरच्या अपघाताला उल्का गोळा जबाबदार आहे. या अपघातात तीन लोक जखमी झाले होते. २०१३ मध्ये देखील रशियात उराल पर्वतात एक मोठा उल्का कोसळला होता, त्यानंतर भूकंप आला होता. या दरम्यान १२०० लोक जखमी झाले होते. तर हजारो रुपयांचे नुकसान झाले होते.

आरोग्यविषयक वृत्त –