खरंच कोट्यवधी रूपयांचा आहे का, ‘हा’ आकाशातून पडलेला 2.75 किलोचा ‘उल्काष्म’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जोरदार आवाजासह चपट्या आकाराची ही वस्तू आकाशातून येऊन पडली आणि जमिनीत एक फुटापर्यंत रूतली. याचा आवाज 2 किमीपर्यंत ऐकू गेला. हे एक उल्काष्म होते, ज्यास एका मशिनने तपासण्यात आले तेव्हा समजले याची किंमत करोडो रूपये आहे. राजस्थानमध्ये जालोर जिल्ह्याच्या सांचौर चरखी गायत्री कॉलेजजवळ पडलेल्या धातुच्या तुकड्याची माहिती मिळताच शुक्रवारी प्रांताधिकारी भूपेंद्र यादव या ठिकाणी आले होते आणि त्यांनी आकाशातून पडलेला हा धातू पाहिला. यादरम्यान धातू तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांचे पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर परिक्षण केले असता, आकाशातून पडलेला या धातूचे वजन 2 किलो 788 ग्रॅम भरले.

या धातूची जेव्हा कम्प्युटरद्वारे तपासणी करण्यात आली तेव्हा त्याच्या पृष्ठभागावरील धातूची मात्रा प्लॅटीनम 0.05 ग्रॅम, नायोबियम 0.01 ग्रॅम, जर्मेनियम 0.02 ग्रॅम, आयर्न 85.86 ग्रॅम, कॅडमियमची मात्रा 0.01 ग्रॅम, निकेल 10.23 ग्रॅम आढले, ज्याचे एकुण वजन 2.788 किलोग्रॅम आहे. याबाबत कम्प्युटर टेस्टींगचे डायरेक्टर शैतानसिंह कारोला यांचे म्हणणे आहे की, त्या उल्काष्माच्या परिक्षणात पृष्ठभागावरून 5-6 धातूंची माहिती मिळाली आहे, ज्यामध्ये प्लॅटिनम सर्वात महागडा धातू आहे. प्लॅटिनमचा भाव 5 से 6 हजार रुपये प्रतिग्रॅम आहे. जर त्याचे परिषण करताना आतमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे मटेरियल निघाले तर याची किंमत करोडो रूपये होऊ शकते.

जालोर जिल्ह्याच्या सांचोर शहरात शुक्रवारी सकाळी सुमारे सव्वा सहा वाजात आकाशातून मोठ्या आवाजासह एक धातूची वस्तू पडल्याने परिसरात दशहत पसरली होती. आकाशातून पडलेल्या वस्तूचा आवाज इतका जोरदार होता की, तो दोन किलोमीटर पर्यंत ऐकू गेला. आकाशातून पडलेले हे उल्काष्म तीन तासानंतर सुद्धा गरम होते. त्याच्या कोसळण्याने जमीनीत एक फुटाचा खड्डा पडला होता. आकाशात कधी-कधी एकीकडून दुसरीकडे जाणारे किंवा पृथ्वीकडे येताना उल्काष्म दिसतात. त्यांना उल्का आणि बोलीभाषेत तुटणारा तारा असे म्हटले जाते. उल्कांचा अंश जेव्हा वायुमंडळात जळाल्याने वाचून पृथ्वीपर्यंत पोहचतो तेव्हा त्यास उल्काष्म म्हणतात. रोज रात्री आकाशात असंख्य उल्का दिसतात, परंतु यातील पृथ्वीवर पडणार्‍या उल्कांची संख्या खुप कमी असते. शास्त्रीय दृष्टीकोनातून याचे महत्व खुप आहे, कारण हे अतिशय दुर्लभ असते. दुसर्‍या आकाशात भ्रमण करणारे विविध ग्रह इत्यादीचे संघटन आणि संरचनेच्या अभ्यासाचा प्रत्यक्ष स्त्रोत केवळ हे उल्काष्मच असतात.