सावधान ! ‘या’ १३ राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता : हवामान विभाग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी उत्तर प्रदेशसह १३ राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मैदानावरही ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार येत्या तीन दिवसांत देशातील बर्‍याच राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सोमवारी पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल डोंगराळ, सिक्कीम, अंदमान, निकोबार आणि मेघालय येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, आंध्र प्रदेश, किनारी कर्नाटक, तामिळनाडूच्या बर्‍याच भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

तर मध्य प्रदेशात सामान्यपेक्षा ३४ टक्के आणि राजस्थानमध्ये ३६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या भोपाळ कार्यालयातील ज्येष्ठ मेट्रोलॉजिस्ट जीडी मिश्रा म्हणाले की, पूर्व मध्य प्रदेशात मान्सूनचा वेग कमी झाला आहे, परंतु पश्चिम भागात मान्सून अजूनही पूर्णपणे सक्रीय आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी इंदूर, मंदसौर, नीमच, आगर मालवा आणि अलिराजपूरसह १० जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय भोपाळसह ३२ जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय गुजरात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यासह दक्षिणेतील प्रमुख पाच राज्यांत कित्येक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. यावर्षी आतापर्यंत उत्तर प्रदेशात सामान्यपेक्षा २४ टक्के कमी पाऊस झाला आहे. हरियाणामध्ये आतापर्यंत ४१ टक्के आणि बिहारमध्ये २२ टक्क्यांनी कमी पाऊस झाला आहे.

 

You might also like