बाळंतपणानंतर त्वचेवरील सिझरच्या खूणा घालवण्यासाठी करा ‘हे’ 3 उपाय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – बहुतांश महिलांना डिलिव्हरी साठी सीझर करावे लागते. सिझेरिअन डिलिव्हरीनंतर सूज येणे त्वचा लाल होणे या समस्या निर्माण होतात. तसेच ओटी पोटावर खुणा दिसतात. अनेकदा या खुणांचा त्रास सुद्धा होत असतो. काही महिलांना जखमा होऊन इन्फेक्शन सुद्धा झालेलं असते. याला सी सेक्शन स्कार असे सुद्धा म्हटलं जाते.

सी सेक्शन स्कार झाल्यावर काही लक्षणे दिसून येतात. क्लिअर स्त्राव या ठिकाणातून होत असतो. त्याने पायांना सूज येणे, पोटाचे विकास उद्भवणे, ताप येणे, डोकेदुखी, डिहायड्रेशन होत असते. तसेच काही खाण्याची इच्छा होत नाही. मांसपेशी दुखण्याचा त्रास होतो. म्हणून सी-सेक्शन स्कारला मुलायम ठेवण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर करुन खाजेपासून सुटका मिळवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत. ज्याच्या वापराने तुम्ही त्वचेवरील सेक्शन स्कारला कायमचे दूर ठेवू शकता.

१. तेलाने मसाज
व्हिटॅमिन ई युक्त असलेल्या तेलाचा मसाज केल्यावर सीझरच्या खुणांपासून सुटका मिळू शकते. त्या ठिकाणची त्वचा मुलायम होऊन खुणा निघून जाण्यास मदत होईल. त्याशिवाय लेजर थेरेपीचा वापर करुन सुद्धा त्वचेला चांगले ठेवू शकता. पण घरगुती उपायांच्या तुलनेत लेजर थेरपीचा खर्च खूप जास्त असतो.

२. एलोवेरा जेल
एलोवेरा जेलचा वापर सीझरच्या खुणा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो. त्वचेला एलोवेरा जेलचे अनेक फायदे आहेत. एलोवेरा जेलमध्ये असलेले एन्टी ऑक्सीडंट्सत्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात. त्यामुळे व्हिटामीन ई चा फायदा मिळत असतो. म्हणून एलोवेरा जेलचा वापर करून तुम्ही सिझरच्या खूणा मिटवू शकता. त्यासाठी एलोवेरा जेलने त्या भागावर मसाज करा. यामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.

३. मध
मधात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स मुळे नैसर्गिक रित्या तुमच्या चेहऱ्याला चमक येण्यासाठी त्याचा वापर तुम्ही करु शकता. शरीरात असलेल्या रॅडिकल्ससह लढण्यासाठी मधात असणारे अँटीऑक्सिडंट्स मदत करतात. त्यामुळे मधाचा वापर जर तुम्हाला सिझरच्या खूणा सहजरित्या घालवता येतात. मधाचा वापर करुन तुमच्या त्वचेचं टॅनिंग करण्यास मदत होते.

( टिप : यातील कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या )