डिलिव्हरीनंतरच्या त्वचेवरील सीझरच्या खुणा घालवण्यासाठी 3 घरगुती सोपे उपाय !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अनेक महिलांचं बाळाला जन्म देताना सीझर केलं जातं. यामुळं ओटी पोटीवर अनेक खुणाही दिसतात. यालाच सी सेक्शन स्कार असं म्हणतात. हे दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

1) अ‍ॅलोवेरा जेल – सीझरच्या खुणा कमी करण्यासाठी याचा मोठा लाभ होतो. यातील अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई मुळं खूप फायदा मिळतो. या जेलनं त्वचेवर मसाज केल्यानं सीजरच्या खुणा कमी होण्यास मदत होते. यानं त्वचाही चांगली राहते.

2) तेलाची मसाज – सीझरच्या खुणा घालवायच्या असतील तर व्हिटॅमिन ईच्या तेलानं मसाज करा. यानं त्वचा मऊ तर राहिलच सोबतच खुणा कमी होण्यासही मदत होते. काही लोक लेजर थेरपीही करतात. परंतु हा खूप खर्चिक पर्याय आहे.

3) मध – मधाच्या वापरानंदेखील सीझरच्या खुणा सहजा घालवल्या जाऊ शकतात. यानं त्वचेचं टॅनिंगही दूर होतं. शरीरात असणाऱ्या रॅडिकल्ससोबत लढण्यासाठी मधातील अँटीऑक्सिडंट्सचा खूप फायदा होतो.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाची त्वचा वेगळी असते. त्यामुळं काही पदार्थ काहींच्या त्वचेला सुट करतात मात्र काहींमुळं नुकसानही होतं.