#MeToo : केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्याविरूद्ध १९ महिला पत्रकारांची कोर्टात धाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मी टू मोहिमेंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप झालेले केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एक. जे. अकबर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पत्रकार प्रिया रमाणी यांनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, रमाणी यांचे आरोप फेटाळून लावत अकबर यांनी कोर्टात धाव घेत अकबर यांनी प्रिया यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला. आता प्रिया रमाणी यांच्याबाजूने १९ महिला पत्रकार कोर्टात साक्ष देणार आहेत. या १९ महिला पत्रकारांनी कोर्टात स्वाक्षरीसह एक विनंती अर्ज केला आहे. केंद्र सरकार याप्रकरणात अकबर यांना सहकार्य करत असल्याचा आरोप होत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’08a48a62-d1ca-11e8-b254-47dacc059c28′]

१९ महिला पत्रकार प्रिया रमाणी यांच्याबाजूने साक्ष देण्यास तयार झाल्याने त्यांची बाजू भक्कम झाली आहे. अकबर हे एशियन एजचे संपादक असताना त्यांच्यासोबत या महिला पत्रकारांनी काम केले आहे. त्यामुळे आता १९ महिला पत्रकार विरूद्ध अकबर असा सामना कोर्टात होणार आहे. १९ महिला पत्रकारांनी कोर्टात केलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे की, अकबर यांनी आमच्या माजी सहकारी प्रिया रमाणी यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा केला आहे. अकबर आपल्या पदाच्या जोरावर हे सर्व करत आहेत. मात्र, त्यांनी जुन्या गोष्टी टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी या लढाईत आम्ही रमाणी यांच्यासोबत आहोत. म्हणूनच मानहानीच्या दाव्यावर सुनावणी घेत असताना आमचेही म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती केली आहे. सोमवारी अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

[amazon_link asins=’B07G2SWBT2′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’186262e5-d1ca-11e8-8305-d9284d67d85a’]

रमाणी यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या १९ महिला पत्रकारांमध्ये सध्या तीन संपादक पदावर कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई मिरर आणि डेक्कन क्रॉनिकलच्या संपादक पदावर कार्यरत आहेत. तर तिसरी महिला पत्रकार एशियन एजच्या निवसी संपादक आहेत. तीन महिला संपादक मी टू अभियानामध्ये सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, मंगळवारी तुषिता पटेल यांनी अकबर यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. एम. जे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा किस केले. तसेच एकदातर ते चक्क अंतर्वस्त्रातच आपल्यासमोर आल्याचा आरोप महिला पत्रकार तुषिता पटेल यांनी केला आहे. स्क्रोल या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखामधून पटेल यांनी हा आरोप केला आहे.

[amazon_link asins=’B016V3663Y’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’809fdef9-d1ca-11e8-83e0-891aa34f6dc6′]

मीनल बघेल, मनिषा पांडे, तुषिता पटेल, कनिका गहलोत, सुपर्णा शर्मा, रामोला तलवार बादाम, कनिझा गाझारी, मालविका बॅनर्जी, ए. टी. जयंती, हमिदा पारकर, जोनाली बोरागोहेन, संजरी चटर्जी, मीनाक्षी कुमार, सुजाता दत्ता सचदेव, होइनु हॉजेल, रेश्मी चक्रवर्ती, कुशालराणी गुलाब, आयशा खान, किरण मनराल या १९ महिला पत्रकारांनी रमाणी यांना पाठिंबा देत कोर्टात साक्ष देण्याची तयारी केली आहे.

माहीम रेल्वे स्थानकात विद्यार्थिनीचा विनयभंग

 

मुंबई : पादचारी पुलावर उभ्या असलेल्या एका दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी यासंदर्भात मुंबई सेन्टड्ढल लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदविली. तपासानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. परमजीत सिंग असे आरोपीचे नाव असून तो मूळचा पंजाबमधील राहणारा आहे. ही दहा वर्षीय मुलगी प्रभादेवी येथील शाळेत जाण्यासाठी निघाली होती. दोघीही माहीम स्थानकातील (दादर दिशेने) पादचारी पुलावर जाऊन उभ्या राहिल्या. तेव्हा पुलावरून जाणाऱ्या परमजीत सिंगने यातील एका मुलीला अक्षेपार्ह स्पर्श करून विनयभंग केला व तेथून पळ काढला.

अमित शाहांचा मुंबई दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

जाहिरात