#MeToo : लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या दिग्दर्शकाचा चित्रपट अमिरने सोडला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडमध्ये सुरू झालेल्या मी टू मोहिमेंतर्गत बॉलिवूड अभिनेता आमिर खान याने मोठा निर्णय घेतला आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप झालेल्या एका दिग्दर्शकाच्या चित्रपटातून आमिर खान बाहेर पडला आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने याबाबत माहिती दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’008e1deb-cd0e-11e8-9970-099b381cf317′]

आमिर खानने त्याची पत्नी किरण राव आणि स्वतःच्या वतीने एक पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. या पत्रकात म्हटले आहे की, आम्ही ज्या व्यक्तीसोबत चित्रपट करणार होतो त्याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत असे आम्हाला समजले. त्याबाबत आम्ही चौकशी केली असता, लैंगिक छळाबाबतचे ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अद्याप त्या प्रकरणाचा निकाल आलेला नाही, त्यामुळे या चित्रपटातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही नेहमीच महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा विरोध केला आहे, सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यात आम्ही प्रतिबद्ध आहोत. आम्ही कोणत्याही प्रकारच्या लैंगिक छळाचा निषेध करतो आणि अशा प्रकरणांमध्ये खोट्या आरोप करणाऱ्यांचीही निंदा करतो.

[amazon_link asins=’B00AWKJPMC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0f62cf5c-cd0e-11e8-a9f3-1dda23b042d9′]

या पत्रकामध्ये आमिर खानने कुठेही त्या दिग्दर्शकाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. मात्र २००४ मध्ये एका दिग्दर्शकाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, या व्हिडीओत एक मॉडेल त्या दिग्दर्शकाच्या थोबाडीत लगावताना दिसत होती. दिग्दर्शकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप त्या मॉडेलने केला होता, त्याच्याबाबतीत आमिर खानने हे पत्रक काढल्याची चर्चा आहे. आमिर खान सध्या यशराज बॅनरचा चित्रपट ठग्स ऑफ़ हिंदोस्तानच्या प्रदर्शनाच्या तयारी करत आहे. दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

आलोकनाथ नरकात सडणार : सई ताम्हणकरचा शाप

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us