या कारणामुळे अक्षयने ‘हाऊसफुल्ल 4’ चं शूटिंग रद्द केलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
 #MeToo  चे वादळ सध्या बॉलिवूड मध्ये घुमत आहे. याआधी अभिनेता आमिर खानने #मी टू अंतर्गत तक्रार झालेल्या दिगदर्शकाबरोबर काम करण्यास नकार दिला आहे . आता अभिनेता अक्षय कुमार ने देखील  ‘हाऊसफुल्ल 4′ चं चित्रीकरण रद्द केल्याची माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d1619925-ce06-11e8-aff9-91bd38bf47d4′]

काय आहे अक्षय कुमारचे ट्विट 
अक्षय कुमारने लिहिलंय की, “मी आताच भारतात परतलो असून काही बातम्या वाचल्या. तपास पूर्ण होईपर्यंत चित्रीकरण रद्द करण्याची विनंती मी ‘हाऊसफुल्ल 4’ च्या निर्मात्यांना केली आहे. अशा आरोपांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. जो दोषी सिद्ध होईल, त्याच्यासोबत मी काम करणार नाही. ज्यांच्यावर अत्याचार झाले आहेत, त्यांच्या व्यथा ऐकून त्यांना न्याय मिळाला हवा.”

साजिदवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
पत्रकार करिश्मा उपाध्याय यांनी साजिद खानवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. तर साजिदने अनेक महिने माझं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप ‘हमशक्ल’ सिनेमात साजिदची सहदिग्दर्शक असलेली सलोनी चोप्राने केला आहे. याशिवाय अभिनेत्री रॅचेल व्हाईटनेही साजिदवर आरोप केले होते.

#MeToo : दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप

साजिद खानची माघार

तर दुसरीकडे या आरोपांची नैतिक जबाबदारी स्वीकारत साजिदने स्वत:च ‘हाऊसफुल्ल 4’ च्या दिग्दर्शनातून माघार घेतली आहे. “सत्य समोर येईपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत जाऊ नका,” असं आवाहन साजिदने ट्विटरच्या माध्यमातून मीडियाला केलं आहे. तसंच कुटुंब आणि सिनेमाच्या निर्मात्यांवर दबाव येत असल्याने हा निर्णय घेतल्याचं साजिदने सांगितलं.

#MeToo मोहिमेमुळे ‘हा’ अभिनेता झाला सावध

आमीर खानचा निर्णय

अक्षय कुमारआधी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानने गुलशन कुमार यांच्या ‘मुगल’ या बायॉपिकमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक सुभाष कपूरवर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर आमीरने हा निर्णय घेतला होता. तर या आरोपांनंतर चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी सुभाष कपूरकडून दिग्दर्शनाची जबाबदारी काढून घेतली होती.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3531a9a6-ce07-11e8-b090-09a11a6b3705′]