#MeToo : ऐश्वर्या राय बच्चनच्या नावे खोटे ट्वीट व्हायरल ?

मुंबई : वृत्तसंस्था

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने मीटू अंतर्गत आपला अनुभव शेअर केल्याचं ट्वीट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे ऐश्वर्याच्या व्हेरिफाईड अकाऊंटवरून हे ट्वीट केले आहे असे दिसत अाहे परंतु ऐश्वर्याने ‘मी टू’चा अनुभव सांगितल्याचं खोटं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मीटू चळवळीमुळे एकीकडे महिलांना आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी बळ मिळत आहे, मात्र याचा गैरफायदा घेणारेही असू शकतात. ऐश्वर्याने नाव न घेता सुपरस्टार सलमान खानकडे अंगुलीर्निदेश केल्याचं यामध्ये दिसतं.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2239be47-d054-11e8-a6ae-d128e3c2e21e’]

@AishwaryaRai या कथित वेरिफाईड अकाऊण्टवरुन ट्वीट झाल्याचा स्क्रीनशॉट पाहायला मिळतो. मात्र ऐश्वर्या मुळात ट्विटरवर नाही. त्यामुळे तिने कुठला ट्वीट केल्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

#MeToo : ‘हा’ खानही शोषणाचा शिकार

‘हो, आधीच्या विखारी रिलेशनशीपमध्ये माझ्यावर अत्याचार झाला, मारहाण झाली आणि कित्येक वेळा धमकावलंही गेलं. बॉलिवूडचा सर्वात मोठा धर्मादाय माणूस जो स्वतःला ह्युमन म्हणवतो, त्याला प्रत्यक्षात अजिबात माणुसकी नाही’ असं ऐश्वर्याने लिहिलं असल्याचा खोटा ट्वीट व्हायरल झाला आहे. ‘मी नेहमीच अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता, आणि भविष्यातही तसं करत राहेन, मिस वर्ल्डच्या मंचावर माझ्या हातात माईक आला तेव्हापासूनच… जग लहान होत आहे आणि सोशल मीडियामुळे माणसं जवळ येत आहेत. जगातल्या कुठल्याही भागातील व्यक्ती आपली गोष्ट सांगू शकतो’ असं ऐश्वर्या गेल्या मंगळवारी (9 ऑक्टोबर) मीडियाशी बोलताना म्हणाली होती.

सलमान आणि ऐश्वर्या 1999 साली डेटिंग करत होते. त्यानंतर ऐश्वर्याने 2002 मध्ये सलमानसोबत ब्रेकअप करत असल्याची जाहीर वाच्यता केली होती. अविश्वास आणि सलमानचा क्रोध यामुळे नातं संपवत असल्याचं ऐश्वर्याने सांगितलं होतं. सलमान शारीरिक आणि मानसिक अत्याचारासोबत शिवीगाळ करत असल्याचा आरोपही त्यावेळी ऐश्वर्याने केला होता. सलमानने मात्र ऐश्वर्याला मारहाण केल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर, 2007 मध्ये ऐश्वर्याने अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लगीनगाठ बांधली.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0714DP3B9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2ce2a02f-d054-11e8-8930-038c3ea856fe’]

ऐश्वर्याप्रमाणे तिचे सासरे अमिताभ बच्चन यांनाही फेक मेसेजचा फटका बसला. माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री सयाली भगतने बिग बींवर काही वर्षांपूर्वी केलेल्या कथित आरोपांची चर्चा पुन्हा रंगली होती. मात्र, मी बच्चन यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केलेले नाहीत, आमची बदनामी थांबवा, अशी विनंती सयालीने केली. त्यामुळे सयालीच्या नावे फिरणाऱ्या खोट्या मेसेजमध्ये काहीही तथ्य नसल्याचं सिद्ध झालं.

#MeToo बाबत अभिनेते शक्ती कपूर यांची ऑडिओ क्लिप; थेट मोदींना आवाहन

[amazon_link asins=’B00KJI2GIM,B01LXLBDCQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’443c1b2b-d054-11e8-9065-1d25df0d84cb’]