#MeToo अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलांच्या पोस्टची सत्यता पडताळनार : अमित शहा 

नवी दिल्ली :  पोलीसनामा ऑनलाईन

#MeToo च्या मोहिमेने देशभरात धुमाकूळ माजला आहे. यात फक्त सिनेसृष्टीच नव्हे तर, राजकीय, शैक्षणिक, कोर्पोरेट सेक्टर यांमधून #MeToo च्या घटना समोर येत आहेत. यादरम्यान #MeToo मोहिमे अंतर्गत महिला पत्रकारांनी माजी संपादक आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केले होते. त्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अकबर यांच्यावर  झालेल्या आरोपांची चौकशी होणार असल्याचे म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’29d4e021-ced6-11e8-873b-e9783a1d934a’]

विविध माध्यमसमूहांमध्ये संपादक म्हणून काम पाहिलेले माजी संपादक आणि परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर संपादक म्हणून काम करत असतांना महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोप #MeToo च्या मोहिमेअंतर्गत करण्यात आला आहे. यादरम्यान अकबर यांच्यावर आरोप करणाऱ्या त्या महिलांच्या पोस्टची सत्यता पडताळून पाहिली जाणार आहे. कारण कोणीही माझ्याही नावाचा देखील उल्लेख करून काहीही लिहू शकते. त्यासाठी आरोपांची चौकशी केली जाईल. असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी  म्हंटले आहे.

विशेष म्हणजे  #MeToo अंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर आरोप झाल्यानंतर प्रथमच भाजपकडून पहिली प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. त्यामुळे शहा यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

#MeToo वर अभिनेते कमल हसन यांचे वक्तव्य

विविध माध्यमसमूहांमध्ये संपादक म्हणून काम करताना एम. जे. अकबर यांनी महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याच्या आरोप करण्यात आला आहे. ९ महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे अकबर यांचा राजीनामा घेण्याचा दबाव केंद्र सरकारवर वाढत आहे.  एम. जे. अकबर हे सध्या नायजेरिया दौऱ्यावर आहेत.  येत्या रविवारी ते भारतात परत येणार आहेत.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B072FJPFTC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b96b4c24-ced6-11e8-beeb-5bc3234f2fb0′]