#Metoo : अमृता पुरीच्या ट्विटने फरहान अख्तरच्या नाकाला झोंबल्या मिरच्या ?

मुंबई : वृत्तसंस्था

मीटू मोहिमेअंतर्गत अनेकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खावर देखील गैरवर्तनाचे आरोप झाले. या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे. एकापाठोपाठ एक महिलांनी साजिद खानवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. याच आरोपांमुळे साजिदला हाऊसफुल ४ मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. साजिदची बहिण फराह खान आणि चुलत भाऊ फराहन अख्तर यांनीही साजिदने चूक केली असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील असे म्हटले आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरीने ट्विट करुन आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. या ट्विटनंतर फराह अख्तरच्या नाकाला चांगल्याच मिरच्या झोबल्या असून त्याने अमृताला सुनावले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fbf78e9a-cf92-11e8-9fde-6177893938e5′]

‘साजिद खान महिलांसोबत कसा वागतो, हे प्रत्येकालाचं ठाऊक आहे. साजिदसोबत गाठ पडलीचं तर सावध राहा, असे मलाही अनेकांनी बजावले होते. साजिदवर जे काही आरोप ठेवले जात आहेत, ते त्याच्या कुटुंबासाठी धक्कादायक आहेत, हे ऐकून मला आश्चर्य वाटतेय. त्याच्या कुटुंबाला हे आधीच माहित असायला हवे होते,’असे ट्विट अमृता पुरीने केले आहे.

साजिदने वा फराह खानने अमृता पुरीच्या या ट्विटला उत्तर दिलेले नाही. पण साजिदचा चुलत भाऊ फरहान अख्तर हा मात्र अमृताचे हे ट्विट वाचून चांगलाच भडकला. मग काय फरहान लगेच अमृतावर तुटून पडला. ‘तुझा राग मी समजू शकतो. पण आम्हाला साजिदबद्दल सगळे ठाऊक असूनही आम्ही शांत राहिलो, हा तुझा आरोप मात्र मला मान्य नाही. आमच्यासाठी साजिदवरचे आरोप खरोखरंच धक्कादायक आहेत, ’असे फरहानने अमृताला सुनावले.

[amazon_link asins=’B078124279,B0745BNFYV,B01M0JSAFU,B0784BZ5VY,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06457f0a-cf93-11e8-960e-69c92a4b5b13′]

यानंतर अमृता व फरहान यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली. फरहानचे हे ट्विट बघून अमृताही सणकली. ‘माझे ट्विट थेट तुझ्याबद्दल नव्हते़ मग तुला ते इतके का लागले? माझ्या ट्विटचा अशा पद्धतीने अर्थ लावणे मुळीच योग्य नाही. मी चूक असेल तर माफी. पण साजिदच्या कृत्यांबद्दल सगळेच जाणतात. असे असूनही यामुळे अनेकांना धक्का बसतो, हे मात्र मी पचवू शकले नाही,’असे यावर अमृता पुरी म्हणाली. आता अमृता पुरी व फरहान अख्तर यांच्यापैकी कोण खरं बोलतय, ते लवकरच कळेल.