#MeToo : सिम्बायोसिसचे संचालक सक्तीच्या रजेवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) या संस्थेतील ‘मीटू’चे वादळ अद्याप शांत झालेले नाही. जवळपास शंभरहून अधिक आजी-माजी विद्यार्थ्यांनी संस्थेचे संचालक अनुपम सिद्धार्थ यांना पदावरून हटवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यावर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ प्रशासनाने याची चौकशी सुरू केली असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

‘मीटू’ चळवळीच्या माध्यमातून संस्थेतील जवळपास दहा विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक शोषण, तसेच गैरवर्तनाचा प्रकार समोर आणला होता. त्यानतंर विद्यापीठाने अंतर्गत चौकशी समिती नेमून त्याबाबत चौकशीही सुरू केली. पण गैरवर्तन, तसेच मानसिक छळाला सामोरे जावे लागलेल्या अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आता उघडपणे याबाबतची तक्रार केली आहे. सुमारे १०० हून अधिक विद्यार्थिनींनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासन विभागाचे अधिष्ठाता डॉ. भामा वेंकटरमणी यांच्याकडे अनुपम सिद्धार्थ यांच्याविषयी ई-मेलद्वारे तक्रार केली आहे. संस्थेच्या बंगळुरू येथील आवारातील एक लैंगिक शोषणाचा प्रकारही दडपल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी दिवसभर विद्यापीठ अंतर्गत चौकशी समितीसमोर अनुपम सिद्धार्थ यांची चौकशी सुरू होती.

जलयुक्त शिवारच्या यशाचा दावा फोल, १४ हजार गावांत भूजल पातळीत घट

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर यांनी सांगितले की, विद्यार्थिनींच्या तक्रारी मिळाल्या आहेत. त्यावरच विद्यापीठाच्या अंतर्गत चौकशी समितीकडून शनिवारी अनुपम सिद्धार्थ यांच्यावरील तक्रारींची चौकशी सुरू होती. या समितीचा प्राथमिक अहवाल विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे प्राप्त झाला आहे. त्यानुसार कुलगुरूंनी त्यांना सखोल चौकशी होईपर्यंत रजेवर पाठविले आहे. यावर सिद्धार्थ अनुपम यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.

सिंबायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन (एससीएमसी) मधील सध्याचे आणि पूर्वीच्या विद्यार्थीनींनी एकत्र येत याविरुद्ध ही मोहिम सुरु केली आहे. त्यात त्यांनी दोन पातळीवर मानसिक त्रास दिल्याचे म्हटले आहे. अनुपम सिद्धार्थ विरोधात विद्यार्थीनींनी केलेल्या तक्रारीत त्याच्या वाईट सवयीविषयी लिहिले आहे. त्याने एका विद्यार्थ्यांनीला सांगितले की तो तिच्या केसांना धरुन ठेवेल. आणि त्यांना कॉलेजच्या कॅम्पसमधून बाहेर काढील. ते लैंगिकदृष्टा सक्रिय असल्याचे त्यांच्या पालकांना सांगू आणि सार्वजनिक ठिकाणी केस कापू़, एकाने चुकीच्या दिवशी चुकीचा गणवेश घातल्याने त्याला सार्वजनिक ठिकाणी कपडे काढण्याची धमकी दिली होती.

#MeToo : अनू मलिक यांच्यावरचे आरोप थांबता थांबेना

अनुपम सिद्धार्थ यांनी विद्यार्थ्यांच्या पोशाख, सौंदर्यशास्त्र आणि त्यांच्या शरीराची भाषा यावर सतत अनावश्यक टिप्पणी केली आहे. ‘आज तू लाल लिपस्टिक लावले आहेस, तू कोणाला कुणाला कीस करणार आहेस?’ अशा टिप्पणी सिद्धार्थ नेहमी करीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थीनीनी केल्या आहेत. अनुपम सिद्धार्थ हे हानीकारक भाषेचा वापर करण्याव्यतिरिक्त, शिष्टाचारात विद्यार्थ्यांना शिक्षा देण्यासाठी कुप्रसिद्ध म्हणून ओळखले जात. छोट्याच्या कारणावरुन लॅपटॉप पाचव्या मजल्यावरुन फेकून देण्याची धमकी देणे, बँकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांना अपमानजनक पद्धतीने वागविणे,असे अनेक आरोप या विद्यार्थींनीनी केले आहेत.