#MeToo : दिग्दर्शक सुभाष घईंवर बलात्काराचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावरही आता एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. सोशल मीडियावरील मी टू मोहिमेंतर्ग बॉलिवूडमधील संस्कारी बाबू अलोक नाथ, नाना पाटेकर, रजत कपूर, कैलाश खेर, विकास बहल यांच्यासह अनेक अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. यामध्ये आता सुभाष घई यांच्या नावाची भर पडली आहे. या महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर सुभाष घई यांनी चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अमली पदार्थाचे सेवन करुन आपल्यावर बलात्कार केला असे तिने म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d3bff9aa-cdd2-11e8-8608-d77fbf09043d’]

या महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर या प्रकरणाचा खुलासा केला आहे. या महिलेने एका वृत्तपत्राला माहिती देताना म्हटले की, सुरुवातीला सुभाष घई मला गाण्यांच्या रेकॉर्डिंगसाठी घेऊन जात असत. एवढेच नाहीतर याठिकाणी इतर पुरुष सहकाऱ्यांबरोबर रात्री उशीरापर्यंत बसवून ठेवत असत. तसेच काही वेळेला ते मला घरी सोडविण्यासाठी सुद्धा येत होते. तेव्हा ते मला स्पर्श करत असत. कधी-कधी मी चांगले काम केले म्हणून बराच वेळ मला मिठीही मारत होते. त्यांच्या लोखंडवाला येथील घरी त्यांचे कुटुंबिय राहत नसल्यामुळे चित्रपटाची स्क्रिप्ट वाचण्यासाठी त्यांनी मला बोलावले. त्यावेळी त्यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केले. मी माझी सुटका करण्यासाठी तेथून निघून गेली. पण त्यावेळी मला कामाची आणि आर्थिक गरज असल्यामुळे मी त्यांच्यासोबतचे काम सोडायला तयार नव्हते.

‘या’ केंद्रीय मंत्र्यांचा #Me Too ला पाठिंबा

एकदा म्युझिक सेशन संपल्यानंतर त्यांनी दारु पिण्याचे नियोजन बनवले. त्यावेळी त्यांनी मला प्यायला लावले. त्यानंतर मला कारमध्ये बसवून घरी सोडण्याच्या बहाण्याने एका हॉटेलवर घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर अतिप्रसंग केला. मी याला विरोध केला पण याचा काहीही फायदा झाला नाही. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी घरी सोडले. त्यानंतर काही दिवस मी कामावर गेले नाही. मात्र मध्येच काम सोडले तर पैसे देणार नाही असे त्यांनी मला सांगितले. त्यामुळे मला पुन्हा कामावर जावे लागले.

[amazon_link asins=’B07FR3Y87X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fb3794e4-cdd2-11e8-8e1b-0790c6aaeced’]