#MeTooचे वादळ टाटा मोटर्समध्येही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

# “मी टू “मुळे सोशल मीडियामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. संपूर्ण बॉलिवूड तर या मोहिमेमुळे ढवळून  निघाले आहे.  केवळ बुलिवूडच नाही तर राजकीय, सामाजिक,क्रिकेट विश्वात #मी टू  ने खळबळ उडवून दिल्यानंतर आता हे वादळ कॉर्पोरेट क्षेत्रातही येऊन धडकले आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘ टाटा मोटर्स ‘ च्या एका आधिकाऱ्याबाबत “मी टू” अंतर्गत आरोप करण्यात  आले  आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f623027c-ce13-11e8-bb90-9388f0e034c3′]

टाटा मोटर्सचे कॉर्पोरेट कॉर्पोरेशन कम्युनिकेशन्सचे प्रमुख सुरेश रंगराजन यांच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीचे स्‍क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करण्यात आले आहेत. ट्विटरवर शेअर झाल्यानंतर रंगराजन यांनी ट्विटरवर त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

रंगराजन यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीमध्ये महिला कर्मचाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, तक्रारीत केलेल्या आरोपाबाबत अद्याप चौकशी झालेली नाही. यावर टाटा मोटर्सकडून देखील ट्विट करण्यात आले आहे की, ”टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची कंपनीकडून काळजी घेतली जाते. खासकरून महिलांची कंपनीमध्ये विशेष काळजी घेतली जाते. त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल हे देखील बघितले जाते.”
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff9dc4db-ce13-11e8-9554-e579dcbebc96′]

तसेच त्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे सांगितले, की ”कोणत्याही तक्रारीबाबत चौकशी केली जाईल आणि चौकशीत व्यक्ती दोषी आढळल्यास त्यावर कंपनीकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल. रंगराजन यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रारीबाबत आम्ही चौकशी समिती नेमली असून लवकरच सत्य बाहेर येईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच कंपनीने या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत रंगराजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. असे कंपनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट द्वारे सांगण्यात आलं आहे.”