आता #MeToo चा विळखा बीसीसीआयला… 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन
सिनेसृष्टीच नव्हे तर, राजकीय, शैक्षणिक, कॉर्पोरेट सेक्टर यामधून #MeToo च्या घटना समोर येत आहेत. याच बरोबर हा धुमाकूळ आता भारतीय क्रिकेटमध्येही माजला आहे. या सर्वांसोबत #MeToo ने बीसीसीआयच्या नावालाही डाग  लागला आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2e94bc1f-ced7-11e8-95dd-2b996459927d’]
बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यावर लैंगिग शोषण केल्याचा आरोप केला होता. पण याबाबत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र आता एका महिला पत्रकाराने जोहरी यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
# ‘मी टू ‘ मोहिमेअंतर्गत अभिनेत्री तनुश्री दत्ता  हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप केला होता त्यानंतर बॉलिवूड मध्ये #मी टू चे वादळ उठले. त्यानंतर आता ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि राडा सुरू झाला. तनुश्री नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतरांना नानांची तक्रार करत मोठमोठ्या आवाजात बोलत होती. ती घाबरलेली होती. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जे घडले धक्कादायक होते, असे त्या दिवशी सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी एका वृत्तपत्राला सांगितले. त्या दिवशी ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर असताना काय घडले हे कोणीही सांगण्यास तयार नव्हते. रामदास बोर्डे या स्पॉटबॉयने घडलेला प्रकार कथन केला.
[amazon_link asins=’B075K83QJK,B072P75LFY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e86abe7-ced8-11e8-91ef-6fa39237983b’]
‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. गणेश आचार्य आणि चित्रपटाच्या काही मोठ्या लोकांशी इंग्लिशमधून भांडू लागली. सुरुवातीला सगळ्यांना काय चाललंय तेच कळत नव्हतं. नानानं काहीतरी केलंय, असा तिचा रोख स्पष्ट दिसत होता. सगळे जण तिची समजूत घालत होते. नाना मोठा माणूस आहे. तुझे करिअर बरबाद होईल असेच सगळे तिला सांगत होते. पण तनुश्री ऐकायला तयार नव्हती. ती आपली बाजू तावाने मांडत होती. तिच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत होते. काही वेळातच ती तेथून निघून गेली. थोड्या वेळाने नाना पाटेकर बाहेर आले आणि जणू काही घडलेच नाही असे ते वावरू लागले. पण इतर सारेच नानांकडे संशयाने बघत होते. शूटिंग बघणा-या आणि स्पॉटबॉयला नानांचा राग आला होता. त्यांना पकडा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या अनेकांचे म्हणणे होते, पण पुढे कोणीही आले नाही. प्रत्येक स्पॉटबॉयला आपल्या रोजगाराची चिंता होती. त्यात मीही होतो. त्यामुळे नानांना काहीच झाले नाही.
[amazon_link asins=’B074GY4DSL,B079P2X5R6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65bc584c-ced8-11e8-9263-971f47d75e6f’]