#MeToo : नरेंद्र मोदींनी महिलांच्या बाजूने उभं राहावं : सोना मोहपात्रा

मुंबई: वृत्तसंस्था  – सोशल मीडियावर #MeToo मोहिम जोरात सुरू आहे. संपूर्ण देशभरात #MeToo मोहिमेवरुन वादळ उठलं असतानाच गायिका सोना मोहपात्राने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या ५० टक्के मतदारांसाठी (महिला) भूमिका घेण्याचं आवाहन केलं आहे. #MeToo मोहिमे अंतर्गत अनेक महिला त्यांच्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्यासोबत झालेल्या गैरवर्तनाला वाचा फोडत यात अनेक बाॅलीवूड सितारे, दिग्दर्शक समोर येत आहेत. आपण कधी विचारही करणार नाही अशा लोकांची नावे समोर येत आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’987fe301-d071-11e8-bb47-c524b86b2c91′]
सोना मोहपात्राने सोमवारी एम जे अकबर यांच्याशी संबंधित एक बातमी ट्विट करत हे मत व्यक्त केलं आहे. पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि विद्यमान केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला आहे. सोना मोहपात्राने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रिय नरेंद्र मोदी सर, तुमच्या ५० टक्के महिला मतदारांसाठी तुम्ही भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही वारंवार असा गुन्हा करणाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे. अनेक महिला आपल्याला सामोरं जावं लागलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीचे अनुभव शेअर करत आहेत. त्यांना यातून काही मिळणार नाही आहे. कृपया आमचं ऐका’.
[amazon_link asins=’B01HQ4O058,B017WDVV3M’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a24f7be2-d071-11e8-a64b-7542a1512c8d’]
परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रामानींविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका करण्यात आली आहे. दरम्यान एम जे अकबर यांनी त्यांच्याविरोधात करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे.
Dear @narendramodi sir, you will not be ‘giving in’ to the opposition here but standing up for 50 % of your electorate, us women. The 14 women who have come out & many many more that are scared to along with the 100’s of men who are aware of his behaviour for decades too.