#MeToo मुळे ‘सिम्बायसीस’ मध्ये प्रचंड खळबळ, प्राध्यपकांवर गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन 

#MeToo  या मोहिमेअंतर्गत अनेक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचाराला जगासमोर आणत आहेत. #MeToo ही  लैंगिक शोषणाविरोधातील मोहीम  जोर धरू लागली आहे. मनोरंजन, मीडिया क्षेत्रातील काही महिलांनी त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे उघड केल्याने देशभरात खळबळ माजली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’646264f1-cc50-11e8-8beb-0db2eed4aff1′]

बॉलीवूड, मीडिया तसेच कर्मचारी वर्गातील महिला या मोहिमेअंतर्गत आवाज उठवत होत्या. या लैंगिक अत्याचाराला महाविद्यालयीन विद्यर्थिनीही बळी पडल्या आहेत .

लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या #MeToo या  चळवळीचं लोण आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचलंय. पुण्यातील ‘सिम्बायसीस सेंटर फॉर मीडिया अॅन्ड कम्युनिकेशन’ मधूनही लैंगिक शोषणाचे प्रकार पुढे आला आहे . सदर लैंगिक शोषणाची घटना  महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर  समोर आणली आहे .  ‘सिम्बायसिस’मधील आजी माजी १० विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर तक्रारी मांडल्या असून  धक्कादायक म्हणजे काही विद्यार्थिनींनी प्राध़्यापकांवरही लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

तक्रारींनंतर एससीएमसी प्रशासनानं एक निवेदन सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. ‘महाविद्यालयाचं कॅम्पस लैंगिक शोषणमुक्त राहावं, यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधत आहोत’ असं त्यांनी म्हंटल आहे.

समाज माध्यमांवर होत असलेल्या तक्रारींची दखल घेत एससीएमसी प्रशासनाने फेसबूक पेजवर दिलगिरी व्यक्त करणारं पत्र लिहून माफी मागितली आहे. तसेच याबाबत पुढे येऊन स्थापन केलेल्या समितीकडे तक्रार देण्याचंही आवाहन केलं आहे.

https://twitter.com/AnasIly36972260/status/1049885748978245632